प्रकाश मेहता आरोप प्रकरणी मुख्यमंत्रीही चौकशीला सामोरे जाणार

प्रकाश मेहता आरोप प्रकरणी मुख्यमंत्रीही चौकशीला सामोरे जाणार

लोकायुक्तांसमोर मुख्यमंत्र्यांचा जाबजबाब होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

21 आॅगस्ट : एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळ्यामुळे वादात अडकलेल्या  गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आरोप प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. लोकायुक्तांसमोर मुख्यमंत्र्यांचा जाबजबाब होण्याची शक्यता आहे.

एमपी मिल प्रकरणात झालेल्या आरोपांसाठी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची लोकआयुक्त चौकशी लवकरच सुरू होणार आहे. एमपी मिलच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांना अवगत असल्याचा शेरा लिहिल्याने संशयाचा रोख मुख्यमंत्र्यांकडेही येतोय. त्यासाठीच लोकआयुक्तांच्या चौकशीला सामोरं जाण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शवली आहे.

मुख्यमत्र्यांनी अधिवेशनादरम्यान याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं..मात्र, आता लोकायुक्तांसमोर मुख्यमंत्री काय स्पष्टीकरण देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 02:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading