S M L

तिरंगा रॅलीत मुख्यमंत्र्यांचा बसला घसा, भाषण थोडक्यात आटोपलं

"माझा आवाज जरी बसला असला तरी माझा आवाज कोणी बसवू शकत नाही, हा भाजप चा आवाज आहे"

Sachin Salve | Updated On: Jan 26, 2018 06:56 PM IST

तिरंगा रॅलीत मुख्यमंत्र्यांचा बसला घसा, भाषण थोडक्यात आटोपलं

26 जानेवारी : भाजपने मुंबईत तिरंगा रॅली काढली होती. या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पण घसा बसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं.

विरोधकांनी काढलेल्या संविधान बचाव रॅलीच्या विरोधात भाजपने तिरंगा रॅली काढून जशाच तसे उत्तर दिले. यावेळी झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. मात्र, भाषणाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचा पुन्हा आवाज बसला. त्यामुळे काही काळ त्यांना बोलणंही अवघड झालं होतं. परदेश दौऱ्यावरून आल्यामुळे माझा आवाज बसलाय अशी जाहीर कबुली देत मुख्यमंत्र्यांना भाषण आटोपत घ्यावं लागलं.

पण माझा आवाज जरी बसला असला तरी माझा आवाज कोणी बसवू शकत नाही, हा भाजप चा आवाज आहे असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. याआधीही मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी प्रचारसभेत भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांचा घसा बसला होता. त्यावेळी "आज पाणी पितोय, उद्या पाणी पाजेल" हा डाॅयलाॅग चांगलाच गाजला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2018 06:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close