News18 Lokmat

शेतकरी संपाच्या आडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव -मुख्यमंत्री

काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेक झालीये. पण अशी दगडफेक शेतकरी करत नाहीत. काही लोक संघर्ष चिघळवण्याचा प्रयत्न करताहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 1, 2017 06:30 PM IST

शेतकरी संपाच्या आडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव -मुख्यमंत्री

01 जून : ट्रक अडवणं, शेतमाल रस्यावर फेकणं, दुध फेकणं हे शेतकऱ्यांचं नुकसान करणारे आहे. मुळात संघर्ष यात्रा फसल्याने काही लोक संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करताहेत. हे राजकीय पक्ष वाहत्या गंगेत हात धुवून घेताहेत. शेतकरी संपाच्या आडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसंच शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

राज्य भरात शेतकऱ्यांचा संपाचा उद्रेक पाहण्यास मिळत आहे. ठिकठिकाणी दुधाचे टँकर, शेतीमाल रस्त्यावर फेकण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना चर्चेसाठी तयार असल्याचं आश्वासन दिलं. तसंच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेक झालीये. पण अशी दगडफेक शेतकरी करत नाहीत. काही लोक संघर्ष चिघळवण्याचा प्रयत्न करताहेत. ट्रक अडवणं, शेतमाल रस्यावर फेकणं, दुध फेकणं हे शेतकऱ्यांचं नुकसान करणार आहे. संपाला गालबोट लागावं, संप चिघळावा असं काही लोकांना वाटतं. खरंतर संघर्ष यात्रा फसल्यानं काही लोक संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करताहेत. हे राजकरणी संपाचा फायदा घेताहेत. हे राजकीय पक्ष वाहत्या गंगेत हात धुवून घेताहेत असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय.

'शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायला वेळ लागेल'

संप फार काळ चालणं हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. यातून मार्ग निघालं पाहिजे. राज्याची उत्पादकता वाढली तरच स्वामीनाथन आयोग फायद्याचा आहे. शेतीचे प्रश्न हे तीन वर्षातले नाहीत. हे प्रश्न सोडवायला जरा वेळ लागेल अशी कबुलीही त्यांनी दिली.

Loading...

'हमी भावासाठी कायदा आणणार'

कडधान्यही बाजार समितीच्या कक्षेच्या बाहेर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. हमी भावापेक्षा शेतीमालाला कमी भाव देणं हा कायदेशीर गुन्हा ठरवणार याबाबतचं विधेयक पावसाळी अधिवेशनात आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

'या वर्षी 54 हजार कोटींचं पीक कर्ज'

आम्ही कर्जमाफीला नाही म्हटलेलं नाही. 31 लाख शेतकऱ्यांसाठी योजना तयार करतोय. 31 लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या कक्षेत आणणार आहोत. राज्य सरकारनं आत्तापर्यंत शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत पुरवलीये. या वर्षी 54 हजार कोटींचं पीक कर्ज देणार आहोत. हे मागच्या वर्षी पेक्षा साडेतीन हजार कोटी जास्त आहे. यात बचत गटांना जास्तीचं कर्ज देणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2017 06:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...