विक्रोळी SRA घोटाळ्याची फौजदारी चौकशी होणार !

विक्रोळी SRA घोटाळ्याची फौजदारी चौकशी होणार !

"संदीप येवले यांनी टीव्हीवर 40 लाख रुपये दाखवलेत. 11 कोटी लाच देऊ केल्याचं त्यांनी सांगितलं. येवले यासंदर्भात कुठेच तक्रार केलेली नाही"

  • Share this:

31 जुलै : विक्रोळीतल्या हनुमाननगर एसआरए प्रकल्पातल्या घोटाळ्याची सरकारनं फौजदारी आणि प्रशासकीय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी एसआरए प्रकल्पातल्या बिल्डरनं 11 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता. शिवाय ओंकार बिल्डरनं एक कोटी रुपये दिल्याचा दावाही संदीपनं केला होता. संदीप ही रक्कम घेऊन फिरतोय. मात्र त्यानं या प्रकरणी पोलिसांत साधी तक्रारही दाखल केली नव्हती. त्यामुळे सरकार या प्रकरणात गप्प का बसलंय असा सवालही उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

संदीप येवले यांनी टीव्हीवर 40 लाख रुपये दाखवलेत. 11 कोटी लाच देऊ केल्याचं त्यांनी सांगितलं. येवले यासंदर्भात कुठेच तक्रार केलेली नाही. मात्र राज्य सरकारने स्वत: या प्रकरणाची प्रशासकीय आणि फौजदारी चौकशी सुरू केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.

First published: July 31, 2017, 9:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading