होय,रायगडमध्ये हेलिकाॅप्टर अपघातातून बचावलो, मुख्यमंत्र्यांची कबुली

होय,रायगडमध्ये हेलिकाॅप्टर अपघातातून बचावलो, मुख्यमंत्र्यांची कबुली

रायगडला हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत पहिल्यांदा दिली.

  • Share this:

26 जुलै : रायगडला हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत पहिल्यांदा दिली.

लातूरनंतर रायगडमध्ये असा अपघात झाल्याचं वृत्त आयबीएन लोकमतनं दिलं होतं. पण असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यावेळेस मुख्यमंत्री कार्यालयाने  दिलं होतं.

आज मात्र धनजंय मुडेंच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी फक्त अपघाताचीच कबुली दिली असं नाही तर पायलटच्या शैलीबद्दलही मुख्यमंत्र्यांनी साशंकता व्यक्त केली.

काय घडलं होतं नेमकं

7 जुलै शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून  ते हेलिकॉप्टरजवळ गेले. पण हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना अचानक टेक ऑफची प्रक्रिया सुरू केली. हेलिकॉप्टरचा पंखा मुख्यमंत्र्यांना लागण्याची शक्यता होती. पण सुरक्षा रक्षकांनी त्यांना वेळेत बाजूला खेचल्यामुळे त्यांना कुठलीही इजा झाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2017 06:33 PM IST

ताज्या बातम्या