• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • रासपचा मेळावा, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर आरक्षणाची घोषणा होणार?

रासपचा मेळावा, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर आरक्षणाची घोषणा होणार?

सत्तेवर येताच धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं.

 • Share this:
  मुंबई, 14 फेब्रुवारी : महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा शिवाजी पार्कवर मेळावा होणार आहे. 24 फेब्रुवारीला होणाऱ्या या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रासपचा हा मेळावा मेळावा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण सत्तेवर येताच धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन सत्ताधारी भाजपकडून देण्यात आलं होतं. पण आता पुन्हा निवडणुका आल्या तरीही या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारला धनगर समाजाच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो. धनगर समाजाचा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रासपच्या मेळाव्यातच आरक्षणाची घोषणा केली जाऊ शकते, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. धनगर आरक्षणाचा तिढा काही दिवसांपूर्वी धनगर आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. 'धनगर आरक्षणाचा अहवाल तयार झालेला आहे. ज्या शिफारशी आम्हाला करायच्या आहे त्या पध्दतीचा हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात काही बाबींची पूर्तता करायची आहे. त्याची पूर्तता करून आम्ही धनगर आरक्षणाची शिफारस करू,' असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. 'आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं जाईल. यासाठी आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी मी विनंती करतो,' असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी धनगर आरक्षणाबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं. संजय राऊतांचा 'यु-टर्न', स्वबळाची तलवार म्यान करून आता मोठ्या भावाचा नारा
  First published: