मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरला अपघात झाला नाही, मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण

परतत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला, अशा अफवा पसरविल्या जात आहेत.

Sachin Salve | Updated On: Jul 7, 2017 06:05 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरला अपघात झाला नाही, मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण

07 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा हेलिकाॅप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहे. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाने असा कोणताही अपघात झाला नाही असा खुलासा केलाय.

शुक्रवारी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून  ते हेलिकॉप्टरजवळ गेले. पण हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना अचानक टेक ऑफची प्रक्रिया सुरू केली. हेलिकॉप्टरचा पंखा मुख्यमंत्र्यांना लागण्याची शक्यता होती. पण सुरक्षा रक्षकांनी त्यांना वेळेत बाजूला खेचल्यामुळे त्यांना कुठलीही इजा झाली नाही. ते सुरक्षित आहेत. पण ते थोडक्यात बचावले असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाने या अपघाताबद्दल खुलासा केलाय. "रायगड जिल्हातील अलिबाग येथे आज एका कार्यक्रमासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. परतत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, असा कुठलाही अपघात झाला नसून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये ", असं मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2017 05:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close