मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांनी 'या' केल्यात घोषणा

मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांनी 'या' केल्यात घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मराठा क्रांती मोर्च्याच्या शिष्टमंडळाने विधानसभेत चर्चा केली.

  • Share this:

09 आॅगस्ट : मुंबापुरीत निघालेल्या अभूतपूर्व मराठा मोर्चाची अखेर सांगता झालीये. त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मराठा क्रांती मोर्च्याच्या शिष्टमंडळाने विधानसभेत चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन दिलं यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी ठोस अशी आश्वासनं दिली.

मुख्यमंत्र्यांच्या निवदेनातील घोषणा

 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून 10 लाखांचं कर्ज घेणाऱ्यांचं व्याज सरकार भरणार

605 कोर्सेससाठी मुस्लिम समाजातल्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती - मुख्यमंत्री

गड किल्ल्यांचं संवर्धन आणि मुंबईतल्या शिवाजी स्मारकाच्या बांधकामाबाबत राज्य सरकार प्रयत्नशील-मुख्यमंत्री

जात प्रमाणपत्र मिळवण्यातल्या अडचणी दूर करणार - मुख्यमंत्री

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती तयार करणार -मुख्यमंत्री

मंत्रीमंडळाची उपसमिती ही समिती मोर्चाच्या प्रतिनिधीमंडळासोबत विविध मागण्यांबाबत चर्चा करणार-मुख्यमंत्री

तीन लाख मुलांना कौशल्य प्रशिक्षण देणार-मुख्यमंत्री

प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उभारणार त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 5 कोटी देणार - मुख्यमंत्री

605 कोर्सेससाठी मराठा समाजाला शिष्यवृत्ती लागू होणार - मुख्यमंत्री

आरक्षणाचं प्रकरण मागासवर्गीय आयोगाकडे आहे -मुख्यमंत्री

आरक्षणासाठी राज्य सरकार अनुकूल -मुख्यमंत्री

कोपर्डीच्या प्रकरणाच्या खटल्याचं कामकाज अंतिम टप्प्यात आहे - मुख्यमंत्री

सभागृहाच्या भावना मोर्चाच्या मागण्यांचं समर्थन करणाऱ्याच - मुख्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2017 05:45 PM IST

ताज्या बातम्या