मुख्यमंत्री-राणेंमध्ये पुन्हा बैठक, समोर आला नवा फॉर्म्युला

मुख्यमंत्री-राणेंमध्ये पुन्हा बैठक, समोर आला नवा फॉर्म्युला

या बैठकीनंतर राणेंची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर राणेंची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत एक नवा फॉर्म्युला ठरल्याचीही शक्यता आहे.

भाजपसोबत आघाडी करण्याबाबत नारायण राणे यांनी तयारी तयारी दर्शवल्याची माहिती आहे. ही आघाडी झाल्यास राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला भाजपकडून राज्यातील पाच लोकसभा जागा दिल्या जाऊ शकतात. असं असलं तरीही राणेंच्या नव्या पक्षाला भाजप इतक्या जागा सोडणार का, याबाबत प्रश्नचिन्हच आहे.

राणेंची काँग्रेससोबतही बोलणी? चव्हाणांचा खुलासा

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागा काँग्रेसच लढवणार असून राणेंशी याबाबतीत कोणताही संपर्क झाला नसल्याचं आणि राणेंबाबत तसा कोणताच प्रस्ताव नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबत रखडलेला दोन-तीन जागांचा तिढा या महिनाअखेरीस सुटेल असंही त्यांनी स्पष्ट केल आहे.

शिवसेना भाजपासोबत राहून लाचार झाली आहे, अशी तिखट प्रतिक्रिया देताना भाजपा सरकारला जनता कंटाळली असल्याचं आपल्या राज्यभरातल्या जनसंघर्ष यात्रेतून जाणवल्याचं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा शेवटचा टप्पा कोकणातल्या सावंतवाडीतल्या सभेने सुरु झाला.

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पक्षाची एंट्री, लोकसभेसाठी 14 उमेदवारांचीही घोषणा

First published: January 22, 2019, 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading