मुंबई, 04 जून : राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं आयोजित इफ्तार पार्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गैरहजेरी लावलीये. त्यामुळे अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे या उपस्थितीत ही इफ्तार पार्टी रंगलीये.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे आज मुंबईत इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. सह्याद्री अतिथीगृहात हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये अनेक मुस्लिम देशांचे राजदूतही सहभागी झाले.
धार्मिक कार्यक्रम शासनाच्या इमारती नको या आशयाखाली काही संघटनांनी या इफ्तार पार्टी ला विरोध केलाय. पण विरोध मोडून काढत सरकारनं इफ्तार पार्टी केलीय.
पण, या इफ्तार पार्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांडी मारलीये. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या इफ्तार पार्टीला हजेरी लावलीये.
या इफ्तार पार्टीला विविध क्षेत्रातल्या मान्यवर हजर आहे. ३० इस्लामिक देशातील वकिलातींचे अधिकारी आणि मुस्लिम समाजातील उच्चपदस्थांना कार्यक्रमासाठी निमंत्रित होते. काही मुस्लिम संघटनांनी या इफ्तार पार्टीवर घातलेला बहिष्कार मात्र कायम आहे.
गेल्या काही वर्षांपासून हा मंच इफ्तार पार्टीचं आयोजन करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कट्टर प्रतिमा बदलण्यासाठी इफ्तारच्या माध्यमातून संघ प्रयत्न करत असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm devendra Fadanvis, Iftar party, RSS, Vinod tawade, इफ्तार पार्टी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे