Home /News /mumbai /

शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले

शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले

 एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस

एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस

एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस

    मुंबई, ०७ जुलै: रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे. शिंदे घराण्यातला पहिला माणूस आज मुख्यमंत्री झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पदभार स्विकारला असून मंत्रालयात आले आहे. यावेळी त्यांच्यासोबत संपूर्ण शिंदे कुटुंबीय हजर होतं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला असून कामाला लागले आहे. आज मुख्यमंत्री मंत्रालयात (mumbai mantralaya) पोहोचले आहे. आज त्यांचा मंत्रालयातला पहिलाच दिवस आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सूनबाई वृषाली शिंदे आणि नातू सुद्धा आला आहे. (शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका, 13,340 कोटींचा 'तो' निधी रोखला) मुळात शिंदे कुटुंबासाठी आजचा दिवस आभाळा एवढा मोठा आहे.एकनाथ शिंदे यांनी संघर्षातून मोठे यश मिळवले आहे. शिवसेनेचा कार्यकर्त्या, पालिकेचे गटनेता, आमदार, मंत्री आणि आता मुख्यमंत्रिपद मिळावले आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबांसाठी आज हा आनंदाचा क्षण आहे. (सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होणार) विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही फोटो लावला आहे. कार्यभार स्वीकारल्यावर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सचिवांशी चर्चा करून खऱ्या अर्थाने आपल्याला सर्व घटकांना सोबत घेऊन गतिमान पद्धतीने कारभार करण्यावर भर द्यायचा आहे, अशी सूचनाही शिंदेंनी सर्वांना दिली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या