मुंबई, 4 जुलै : अनेक दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर शिंदे गट आणि भाजपचं
(Shinde and BJP) सरकार स्थापन झालं आहे. रविवारी अध्यक्षपदाची निवडणूक तर आज बहुमत चाचणीत या युतीने विजय मिळवला. यावेळी मुख्यंमत्री म्हणून एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) यांनी आपली भूमिका मांडली. बंडखोरी का केली? त्यांच्यावर कसा अन्याय झाला, इथपासून रिक्षाचालक ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडून दाखवला. मुख्यमंत्री बोलतानाही काही ठिकाणी भावूक झाले. मात्र, जे खरं आहे, ते बोलायलाही हिंमत लागते, असा टोलाही त्यांनी लगावला. आता हा टोला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना होता की इतर कोणाला याची चर्चा आता रंगत आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
शरद पवार यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यास सांगितलं. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभा होतो. आम्ही सत्तेच्या किंवा पदासाठी लालची नव्हतो. त्यावेळी हे सगळं सुरू होतं, आमदार जे निवडून आले होते, आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढे निवडणूक झाली तर कसं करायचं. शिवसेना आणि भाजप युती म्हणून आपण लढलो होतो. आता काँग्रेससोबत आहे. निवडणूक कशी लढायची. मी पाच वेळा हा प्रयत्न केला होता. पण आम्हाला अपयश आले. केसरकर हे साक्षीदार आहे. त्यानंतर अडीच वर्षांमध्ये वेगवेगळे अनुभव आहे.
हिंदुत्त्वाच्या मुद्यावर बोलू शकत नव्हतो : मुख्यमंत्री
सावरकरांबद्दल बोलू शकत नव्हतो. काँग्रेसने टीका केली, त्याला उत्तर देऊ शकत नव्हतो. हिंदुत्त्वाच्या मुद्यावर बोलू शकत नव्हतो. कालही आम्ही शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचं आणि दिघेसाहेबांचे शिवसैनिक आहोत. कुणी व्यक्तिगत घेऊ नये, सुनील प्रभू यांच्या सभेत गर्व से कहो, हम हिंदू है, असं बाळासाहेब म्हणाले होते. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांचा बाळासाहेबांचा सहा वर्षांच्या मतदानाचा अधिकार कुणी काढला. त्यावेळी तक्रार ही काँग्रेसने केली होती.
माझी दोन मुलं डोळ्यासमोर गेली, मुख्यमंत्री शिंदेंना सभागृहात अश्रू अनावर
अजित पवारांचा माझ्या कामात हस्तक्षेप
अजित पवार हे मंत्रालयात सकाळी सहा वाजताच बैठका घ्यायचे. ते माझ्या खात्याच्या सुद्धा बैठका घ्यायचे. पण ते काम करायचे त्यामुळे मी काही बोललो नाही. त्यांनी 800 कोटी घेतले तरी काही बोललो नाही. पण, अजितदादांनी आणि माझी चांगली अंडरस्टँडिंग होती. त्यांनी एक नोटिंग केलं होतं. त्यानंतर त्यांनी पॅरललं नगरविकास खात्याचा हेड का केला. त्यानंतर मी आक्षेप घेतला. त्यानंतर मी लगेच माघार घेतली. मी कद्रु नाही. काम करणारी माणसं मला आवडतात. माझ्या खात्यात सगळे हस्तक्षेप करायचे. पण मी कधीही काही बोललो नाही. मी लहान होतो, वरिष्ठ मंत्री मला कधीही काढू शकत होते.
कामाख्या देवीला बळी दिला, असं म्हणत होते. पण, आता कामाख्या देवीने कुणाचा बळी घेतला. 40 रेडे पाठवले असं म्हणाले होते, पण माँ कामाख्या बोलली जो बोलला तो रेडा नको, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.