Home /News /mumbai /

शिंदे पॅटर्न! एअरपोर्टवर तरुणांसोबत सेल्फी, तर अण्णा हजारेंसोबत Video Call, हजारे म्हणाले..

शिंदे पॅटर्न! एअरपोर्टवर तरुणांसोबत सेल्फी, तर अण्णा हजारेंसोबत Video Call, हजारे म्हणाले..

नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच विधानभवनात आपलं बहुमत सिद्ध करतील. त्याअगोदर शिंदे यांचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत.

    मुंबई, 2 जुलै : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अखेर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली आहेत. शिंदे यांनी बंडखोरी करुन भाजपसोबत सरकार स्थापन केल्याने अनेक शिवसैनिक नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांचं समर्थन मिळवण्यासाठी आता एकनाथ शिंदे लोकांमध्ये जाताना दिसत आहेत. विधानसभेच्या अध्यक्षपदाची उद्या निवडणूक होणार आहे. यासाठी गोव्यावरुन बंडखोर आमदरांसह येतना एकनाथ शिंदे तिथं उपस्थित असलेल्या तरुणांना सेल्फी देताना दिसले. तर दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्याशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. तरुणांसोबत सेल्फी शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार विधान परिषदच्या 10 जागांच्या निवडणुकीनंतर त्याच दिवशी रात्री म्हणजे 20 जूनला रात्री मुंबईहून गुजरातच्या दिशेला रवाना झाले होते. त्यानंतर ते तिथून गुवाहाटीला गेले होते. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या 11 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व असे फेरबदल झाले. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या शिवसैनिक आमदारांमुळेच मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचं भाजपला पाठिंबा मिळाल्याने भाजप आणखी सक्षम झाली आहे. या सर्व घडामोडींनंतर अखेर 11 दिवसांनी शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आज मुंबईत दाखल होत आहेत. यावेळी गोवा विमानतळावर तेथील प्रवासी एकनाथ शिंदेंसोबत सेल्फी घेत होते. यावेळी शिंदे यांनी देखील आनंदाने त्यांच्या सेल्फीमध्ये सहभाग घेतला. शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याहून मुंबईला रवाना, विमानातला पहिला VIDEO समोर अण्णा हजारे यांना व्हिडीओ कॉल.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एक व्हिडीओ सादर करण्यात आला आहे. यामध्ये एकनाथ शिंदे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी अण्णा हजारे यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. "तुम्ही आत्तापर्यंत जे काम केलं ते खूप चांगलं आहे. इथून पुढे करा, अशा शुभेच्छा हजारे यांनी दिल्या. तर तुमचे आशीर्वीदा आमच्यासोबत सदैव असुद्यात. तुम्हाला कधी काही वाटलं, राज्याच्या हितासंबंधी सूचना द्या, आदेश द्या. मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमचे सर्व सहकारी आम्ही राज्यासाठी चांगलं काम करू. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हक्काने आदेश द्या, अशी विनंती शिंदे यांनी हजारे यांना केली आहे.  शिंदे गट विरुद्ध शिवसेना संघर्ष दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य शिवसेना (Shiv Sena) ही महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi) आहे. तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही अर्थातच भाजपसोबत (BJP) आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूने उमेदवार उभे करण्यात आले आहे. भाजपकडून मुंबईतील कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्य शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेना आमदार राजन साळवी यांना मतदान करण्याबाबतचा देखील व्हीप लागू केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपुढे पेच वाढण्याची शक्यता आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    पुढील बातम्या