Home /News /mumbai /

एकनाथ शिंदेंनी एकेकाची गुपितं केली उघड; विधानसभेत सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये टाळ्या अन् हश्या

एकनाथ शिंदेंनी एकेकाची गुपितं केली उघड; विधानसभेत सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये टाळ्या अन् हश्या

आता लेखी कामात वेळ घालवणार नाही, थेट कार्यवाही करणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. लेखी कामात खूप वेळ जातो. मात्र आता थेट कार्यवाही करणार असंही शिंदे यावेळी म्हणाले.

    मुंबई, 4 जुलै : आज विधानसभेत बहुमत चाचणी झाल्यानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांची भाषणं झाली. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. एक एक करीत एकनाथ शिंदेंनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. शिवसेनेत राहून शिवसैनिकाला काय मिळालं. सत्तेचा फायदा शिवसैनिकाला, विभागप्रमुखाला व्हायला हवा होता. मात्र तो झाला नाही. आमची भूमिका बाळासाहेबांच्या हिंदूत्वाची आहे. त्यामुळे आम्हाला शिवसैनिकांकडून एफिडेव्हिट घ्यावं लागतं नाही. सत्तेचा फायदा तळागाळातल्या शिवसैनिकाला होणं अपेक्षित होतं. शिवसैनिकाला त्याच्या पायावर उभं करायला आपला हातभार लावायला हवा होता. मात्र ते होत नव्हतं. एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे... आता लेखी कामात वेळ घालवणार नाही, थेट कार्यवाही करणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. लेखी कामात खूप वेळ जातो. मात्र आता थेट कार्यवाही करणार असंही शिंदे यावेळी म्हणाले. संतोष बांगर याने मला फोन केला, आणखी तीन-चार जणांना शिंदेंसोबत यायचं होतं. आम्ही कोणत्याही आमदाराला जबरदस्तीने आणलं नाही. सर्वजणं आपल्या मनाने आले आहेत. नितीन देशमुखला मी मुंबईला पाठवलं. मी त्याच्यावर जबरदस्ती केली नाही. सुरुवातीला मी गेलो तेव्हा 29 जणं होतं. त्यानंतर आणखी 15 ते 20 जणं वाढले. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं, मी फक्त माझी पत्नी आणि मुलांसाठी जगायचं ठरवलं होतं. माझ्या घरी दोनदा तिनदा, पाचवेळा आले होते. मला दिघे साहेबांनी ठेंभी नाक्यावर बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसावे लागतील, आणि समाजासाठी काम करावे लागेल. पण त्यांनी मला आग्रह केला. मला त्यावेळी त्यांनी सभागृह नेता केला. मी दिवस रात्र एक केलं. जितेंद्र आव्हाड हे दुसऱ्या पक्षात होते, त्यांना माहिती आहे, काम करत होतो. त्यावेळी लेडीज बारचा सुळसुळाट होता, पैशांची उधळण होत होती. आम्ही पत्र लिहिली पण काही उपयोग होत नव्हता. आय बहिणीचे घरं उद्धवस्त झाली होती. त्यावेळी आम्हाला शिव्या घालत होत्या, पण मी 16 लेडीज बार फोडले होते. माझ्यावर 100 पेक्षा गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदे याला काही झालं नाही पाहिजे, एवढ्या एका शब्दात दिघेंनी शेट्टी लोकांना सांगितलं. आनंद दिघे यांच्या निधनानंतर आगडोंब उसळला होता. त्यावेळी हॉस्पिटलला आग लावण्यात आली होती. त्या आगीच 100 एक लोक मेली असतील, मी स्वत दिघे साहेबांचा मृतदेह हा पोलिसांच्या व्हॅनमध्ये बाहेर काढला होता. त्यावेळे आव्हाड तिथे होते. मी त्यावेळी मंत्रिपदाचा राजीनामा देणार होतो. 6000 कोटींचं कर्ज होता. पण फडणवीस यांनी मला खातं दिलं. एमएसआरडीसीचं खातं दिलं. समृद्धी महामार्गाचं काम दिलं. फडणवीस यांचं खातं देण्याचं काम यांच्या हातात नव्हतं. समृद्धी महामार्गांचं काम सुरू झालं तेव्हा आंदोलनं झाली होती. मी बुलडाण्याला चाललो होतो, त्यावेळी आमचं विमान क्रॅश होणार होतं. आमचा कार्यक्रम होणार होता. शेतकऱ्यांना दिलासा दिला आणि लगेच पैसे दिले. पण, आम्ही ज्या विमानात चाललो होतो, त्या पाठीमागून दुसरे विमान गेले होते. सावरकरांबद्दल बोलू शकत नव्हतो. काँग्रेसने टीका केली, त्याला उत्तर देऊ शकत नव्हतो. हिंदुत्त्वाच्या मुद्यावर बोलू शकत नव्हतो. कालही आम्ही शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचं आणि दिघेसाहेबांचे शिवसैनिक आहोत. कुणी व्यक्तिगत घेऊ नये, सुनील प्रभू यांच्या सभेत गर्व से कहो, हम हिंदू है, असं बाळासाहेब म्हणाले होते. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांचा बाळासाहेबांचा सहा वर्षांच्या मतदानाचा अधिकार कुणी काढला. त्यावेळी तक्रार ही काँग्रेसने केली होती. अजित पवार हे मंत्रालयात सकाळी सहा वाजताच बैठका घ्यायचे. ते माझ्या खात्याच्या सुद्धा बैठका घ्यायचे. पण ते काम करायचे त्यामुळे मी काही बोललो नाही. त्यांनी 800 कोटी घेतले तरी काही बोललो नाही. पण, अजितदादांनी आणि माझी चांगली अंडरस्टँडिंग होती. त्यांनी एक नोटिंग केलं होतं. त्यानंतर त्यांनी पॅरललं नगरविकास खात्याचा हेड का केला. त्यानंतर मी आक्षेप घेतला. त्यानंतर मी लगेच माघार घेतली. मी कद्रु नाही. काम करणारी माणसं मला आवडतात. माझ्या खात्यात सगळे हस्तक्षेप करायचे. पण मी कधीही काही बोललो नाही. मी लहान होतो, वरिष्ठ मंत्री मला कधीही काढू शकत होते. कामाख्या देवीला बळी दिला, असं म्हणत होते पण आता कामाख्या देवीने कुणाचा बळी घेतला. 40 रेडे पाठवले असं म्हणाले होते, पण माँ कामाख्या बोलली जो बोलला तो रेडा, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Mumbai, Shivsena

    पुढील बातम्या