एकनाथ शिंदे यांचा संवेदनशील स्वभाव याआधी विधानसभेच्या सभागृहातही बघायला मिळाला होता. सभागृहात भाषण करताना मुख्यमंत्री भावूक झालेले महाराष्ट्राने पाहिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली धडाकेबाज कामगिरी सुरु केली. मुख्यमंत्र्यांनी आज तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यातील महत्त्वाची घोषणा म्हणजे त्यांनी पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी टोलमाफ केलं आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरला आषाढी एकादशीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंढरपूर (Pandharpur) येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Wari Decision 2022) यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे, याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. (महाराष्ट्रातल्या झटक्यानंतर दिल्लीत शिवसेना सावध, लोकसभेतील प्रतोद बदलला!) आषाढी वारीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. तर आषाढी यात्रेच्या निमित्ताने यावर्षी पंढरपूरात मोठ्या प्रमाणा गर्दी वाढेल. त्यामुळे चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा. ते वेळोवेळी रिकामी होतील, अशी व्यवस्था करा, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा, ठाण्याला वेगळं धरण, 900 खाट्याचं नवं सिव्हील हॉस्पिटल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाणे (Thane) शहरासाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ठाण्यातील 86 वर्षे जूने सिव्हील हॅास्पिटल (Thane Civil Hospital) नवीव बनवण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतच्या सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर ठाण्यात निर्माण होणारं नवं सिव्हील हॉस्पिटल हे 900 खाटांचे होणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ठाण्यासाठी वेगळं धरण उभारण्याची घोषणा केली आहे. ठाणेकरांचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहेVIDEO : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाय घसरून पडलेल्या महिला पोलिसाला दिला मदतीचा हात #EknathShinde #Maharashtra pic.twitter.com/b4HUzuZ6L1
— News18Lokmat (@News18lokmat) July 6, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Maharashtra News, Mumbai News