'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'

'इमारत कोसळणं ही दुर्घटना नव्हे तर हत्याच, घटनेला मुख्यमंत्री जबाबदार'

यासाठी फक्त सरकारलाच दोष देऊन चालणार नाही. लोकांना अनेकदा नोटीस देऊन आणि सांगूनही ते बाहेर निघत नाही.

  • Share this:

मुंबई 16 जुलै : मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळण्याच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. पावसाळ्यात इमारत कोसळणं ही दुर्घटना नाही तर सरकारच्या अनास्थेने केलेली हत्याच असल्याचा आरोप एम.आय.एमचे आमदार वारीस पठाण यांनी केलाय. तर या घटनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. डोंगरी परिसरात मंगळवारी दुपारी केसरबाई ही चार मजली इमारत कोसळली. ही इमारत 100 वर्ष जुनी असल्याची माहिती आहे.

या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. घटनास्थळी NDRF आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO

कोण काय म्हणाले?

मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस-  इमारत 100 वर्ष जुनी होती. पुनर्विकासासाठी विकासक नियुक्त केला होता. म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतीत याचा समावेश नव्हता. विकासकाने काम वेळत केले की नाही याची चौकशी केली जाईल.अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सगळ्यात जास्त प्रधान्य देण्यात आलंय.

विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार - पालिकेवर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. ही घटना दुर्दैवी आहे, पण आम्ही पत्रव्यवहार करुनही पालिकेनं कारवाई केली नाही. अवैध आणि धोकादायक इमारतींवर कारवाई का केली जात नाही? लवकरात लवकर बचाव कार्य करावं. पालिका अशा कामांकडे दुर्लक्ष करतंय. बाधितांना चांगल्या ठिकाणी राहायला जागा दिली जावी.

डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील - डोंगरी इमार कोसळण्याच्या घटनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. त्यांचं प्रशासनावर लक्ष नाही. त्यांचं सर्व लक्ष हे राजकारणावर आहे. त्यांना राज्य खड्ड्यात गेलं तरी हरकत नाही.

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील - यासाठी फक्त  सरकारलाच दोष देऊन चालणार नाही. लोकांना अनेकदा नोटीस देऊन आणि सांगूनही ते बाहेर निघत नाही. त्यांच्याही काही अडचणी आहेत हे मान्य केलं तरी शेवटी काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे. आम्ही आता लोकांच्या तात्पुरत्या राहण्यासाठी पोर्ट ट्रस्टची जागा मागणार आहोत. ती जागा मिळाली तर मोठा प्रश्न सुटेल.

First published: July 16, 2019, 3:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading