Elec-widget

जिल्हा बँकांचं शिखर बँकेत विलीनीकरणाचं मुख्यमंत्र्यांचा सुतोवाच

जिल्हा बँकांचं शिखर बँकेत विलीनीकरणाचं मुख्यमंत्र्यांचा सुतोवाच

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचं शिखर बँकेत विलीनीकरण करा असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीप आढावा बैठकीत व्यक्त केलं.

  • Share this:

28 एप्रिल : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचं शिखर बँकेत विलीनीकरण करा असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीप आढावा बैठकीत व्यक्त केलं.

राज्यात तूर उत्पादनाच्या ढीसाळ नियोजनामुळे सरकारची मोठी नाचक्की सुरू असताना त्यानंतर आता, राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक सुरू झालीये.

खरीप हंगामात शेतकऱ्यांचं पीक उत्पादनांचे नियोजन कसं असावं, यावर या बैठकीत चर्चा सुरू आहे. या बैठकीत  शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेत असतांना सहकार विभागाला मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यात.

तसंच जिल्हा बँका डबघाईला आल्याने पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य पूर्ण होत नाही. 31 बँकांपैकी 11 बँका तोट्यात असून त्यापैकी 9 बँकांची स्थिती नाजूक आहे. सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, वर्धा आणि नागपूर येथील बँकाचा यात समावेश आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

या बैठकीला कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, कृषीराज्यमंत्री सदाशिव खोत, अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, सहाकारमंत्री चंद्रकांत पाटील, दिवाकर रावते, प्रकाश मेहता, डॉक्टर दिपक सावंत, राजकुमार बडोले, महादेव जानकर, बबनराव लोणीकर, तसंच त्यांचे राज्यमंत्री, असं मंत्रिमंडळातील अर्ध्याहुन अधिक मंत्री या आढावा बैठकीला उपस्थितीत असून मंत्र्यांसोबतच राज्याचे मुख्यसचिव आणि इतर संबंधीत विभागाचे सचिव असे सर्वजण उपस्थित आहेत. या खरीप हंगामपूर्व बैठकीत तरी राज्यातील बळीराजाला काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 04:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...