महाराष्ट्र बंदमध्ये गोंधळ घालणाऱ्यांची कुंडली माझ्या हाती,मुख्यमंत्र्यांचा इशारा

महाराष्ट्र बंदमध्ये गोंधळ घालणाऱ्यांची कुंडली माझ्या हाती,मुख्यमंत्र्यांचा इशारा

कालच्या बंदमध्ये कुणी, कुठं किती गोंधळ घातला, जाळपोळ केली ह्याची सगळी कुंडली हाती असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

  • Share this:

06 जून :  शेतकरी संपात सहभागी झालेली शिवसेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  जिव्हारी लागल्याचं दिसतंय. कारण मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईतल्या एका कार्यक्रमात कालच्या बंदमध्ये कुणी, कुठं किती गोंधळ घातला, जाळपोळ केली ह्याची सगळी कुंडली हाती असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

कालच्या संपाबद्दलची पूर्ण तपशील माझ्याकडे आहे. या संपात शेतकरी होतेच पण काही लोकही सहभागी झाले होते. जिथे दगडफेक झाली, जिथे रास्ता रोको झाला तिथे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते काम करत होते. ही लोकं शेतकऱ्यांच्या संपाआडून राजकीय पोळी भाजत आहे अशा लोकांची गय केली जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिली.

विशेष म्हणजे, या महाराष्ट्र बंदमध्ये ठिकठिकाणी शिवसेना सहभागी झाली होती. काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही होते. पण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक होते. कोल्हापुरात तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी संपामुळे भाजप-सेनेत तणाव निर्माण झाल्याचं चित्रं आहे. राजकीय वर्तुळात शिवसेनेला धडा शिकवण्याच्या तयारीत मुख्यमंत्री असल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2017 06:26 PM IST

ताज्या बातम्या