शपथविधीपूर्वीच्या रात्री मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'वर केली खास तंत्रपूजा, अनुष्ठान; News18 कडे EXCLUSIVE PHOTO

शपथविधीपूर्वीच्या रात्री मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'वर केली खास तंत्रपूजा, अनुष्ठान; News18 कडे EXCLUSIVE PHOTO

फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आधी मुंबईतल्या निवासस्थानी होम हवन केला होता, अशी माहिती News18 ला मिळाली आहे.

  • Share this:

रजनीश सेठी

मुंबई, 23 नोव्हेंबर : शनिवारी सकाळी भाजपने राज्यालाच नाही तर देशालाच एक राजकीय धक्का दिला. त्याअगोदर राजभवनावर, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आणि थेट दिल्लीत काय घडामोडी झाल्या हे हळूहळू उलगडत आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आधी मुंबईतल्या निवासस्थानी होम हवन केला होता, अशी माहिती News18 ला मिळाली आहे. राजकीय घडामोडी टिपेला पोहोलच्या त्या रात्री एक ते दीडच्या आसपास हवन आणि अनुष्ठान देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं. मध्य प्रदेशातल्या माळव्यातल्या एका मंदिरातल्या तंत्रविद्या पंडितांनी हे हवन अनुष्ठान केलं आणि आहुतीही दिली.

माळव्यातल्या नलखेडा इथले माँ बगलामुखी मंदिरातले 4 पंडित हे खास अनुष्ठान करण्यासाठी आले होते. हे मंदिर तंत्र आणि इथली देवता तंत्रविद्येच्या पंडितांमध्ये लोकप्रिय आहे, असं म्हणतात. या अनुष्ठानाने बगलामुखीचा आशीर्वाद मिळाला तर विजय निश्चित असतो अशी श्रद्धा आहे.

वाचा - आमदार फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसने उचललं मोठं पाऊल

मुख्यमंत्र्यांनी या राजकीय सर्जिकल स्ट्राइकपूर्वी एक मोठा हवन वर्षा बंगल्यावर केल्याचं उघड झालं आहे. News18 ला या खास पूजा-अर्चा आणि अनुष्ठानाचे फोटोही मिळाले आहेत.

वाचा - ...तर देवेंद्र फडणवीस यांना द्यावा लागेल राजीनामा, अशी आहे पुढील प्रक्रिया

राष्ट्रवादीच्या अजित पवारांना सोबत घेत देवेंद्र फडणवीस सरकार अस्तित्वात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं होतं आणि काँग्रेस- राष्ट्रवादी - शिवसेनेची संयुक्त चर्चा सकारात्मक झाल्याचं निवेदनही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिलं होतं आणि अचानक चक्र फिरली आणि चित्र पालटलं.

माता बगलामुखी मंदिर मध्य प्रदेशातल्या माळव्यातलं तंत्रविद्येसाठीचं प्रसिद्ध मंदिर आहे. महाभारत युद्धापूर्वी पांडवांनी विजयासाठी या मंदिरात याच देवतेला प्रसन्न करून घेतलं होतं, अशीही अख्यायिका आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: November 23, 2019, 3:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading