S M L

VIDEO : मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानावर सपत्नीक केली विठ्ठलाची पुजा

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी पंढरपूरमध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा केली नाही. मात्र ...

Updated On: Jul 23, 2018 08:09 AM IST

VIDEO : मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानावर सपत्नीक केली विठ्ठलाची पुजा

मुंबई, 23 जुलै : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी पंढरपूरमध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा केली नाही. मात्र मुंबईतल्या वर्षा बंगल्यावर त्यांनी सपत्निक विठ्ठलाची महापूजा केली आहे. ज्यावेळी पंढरपूरमध्ये महापुजेला सुरवात झाली त्याच वेळी वर्षामधल्या महापुजेलाही सुरूवात झाली. पंढपूरला जाता आलं नाही तरी पूजेचा नेम चुकवणार नाही. मी माझ्या निवास्थानीच महापूजा करणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या निवासस्थानीच विठ्ठलाची पुजा केली.

आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठी क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यासाठी बंदी घातली होती. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत मी पंढरपुरात जाणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली होती. मला खूप मोठी सुरक्षा आहे. मला कोणी हात नाही लावू शकत पण वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मी पंढरपूरात जाणार नाही असंही ते म्हणाले होते.

आषाढी एकादशीला "अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर..."

दरम्यान, हिंगोलीचे अनिल आणि वर्षा जाधव या दाम्पत्याला विठुमाऊलीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला आहे. तर राज्यातली सगळी धरणं 100 टक्के भरू दे आणि पीकपाणी चांगलं पिकू दे अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी केली, असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय.

आरक्षणाबाबातचे वाद संपून सगळ्यांना आरक्षण मिळू दे असंही ते म्हणालेत. गिरीश महाजन काल मंगळवेढ्यावरून येत असताना त्यांच्या आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा ताफा मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी अडवला होता.

हेही वाचा...

मी उद्या महापूजेसाठी पंढरपूरला जाणार नाही - मुख्यमंत्री

Bigg Boss Marathi अभिनेत्री मेघा धाडे ठरली 'बिग बॉस'

Bigg Boss Marathi- आस्ताद काळे टॉप ५ मधून बाहेर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 08:09 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close