मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्या दिल्लीला जाणार, अमित शहांची घेणार भेट

सत्तावाटपाची कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री अमित शहांशी चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 08:06 PM IST

मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्या दिल्लीला जाणार, अमित शहांची घेणार भेट

विवेक कुलकर्णी, मुंबई 3 नोव्हेंबर : राज्यातल्या अस्थिर राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उद्या म्हणजे सोमवारी राजधानी दिल्लीत जाणार आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. मुख्यममंत्र्यांच्या दौऱ्याचं कारण हे शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी म्हणून मदत मागण्यासाठी असल्याचं सांगितलं जातंय. मात्र सत्तावाटपाची कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री अमित शहांशी (Amit Shah) चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. गेल्या 9 ते 10 दिवसांपासून राज्यात सत्तेतल्या वाटणीवरून पेच निर्माण झालाय. भाजप मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाही तर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवच अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे कोडीं फुटणार कशी असा प्रश्न निर्माण झालाय. तर यावर राज्यातच तोडगा निघावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची इच्छा आहे.

...तर भाजप शिवसेनेला मुंबई महापालिकेत धक्का देणार

कोंडी फोडण्यासाठी काही राज्यातूनच तोगडा निघावा, गरज पडली तरच दिल्लीतून मदत करण्याची भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. मात्र चर्चेलाच सुरूवात होत नसल्याने गाडी पुढे कशी जाणार असा प्रश्न विचारला जातोय. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे राज्यात दररोज नव नवे तोडगे आणि शक्यतांची चर्चा होतेय. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी हरियाणासाठी पुढाकार घेतला तसाच महाराष्ट्रासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं.

'मला नुकताच संजय राऊतांचा मेसेज आला', अजित पवारांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री दिल्लीत जात असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही सोमवारी दिल्लीत असून ते काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून शिवसेनेला पाठिंबा द्यावा या प्रस्तावावरही चर्चा सुरू आहे. आम्ही विरोधी बाकांवर बसणार असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सांगत असले तरी राजकारणात काहीही घडू शकते त्यामुळे या भेटीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Loading...

VIDEO:सत्तास्थापनेचा तिढा सुटेना, शिवसेनेच्या भूमिकेवर रावसाहेब दानवे म्हणतात...

दरम्यान, राज्यातल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानपीडीत शेतकऱ्यांना एनडीआरएफ मधून अधिक आणि तातडीची मदत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 07:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...