महाराष्ट्रातल्या इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी करणार -मुख्यमंत्री

यापूर्वी यूपीए सरकारने 7 हजार कोटींची घोषणा केली होती. आम्ही त्यापेक्षाही मोठी कर्जमाफीची घोषणा करणार आहोत. 30 ते 31 लाख शेतकरी हे थकीत आहे. त्यांना मदत मिळावी यासाठी आमचा प्रयत्न आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2017 08:45 PM IST

महाराष्ट्रातल्या इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी करणार -मुख्यमंत्री

03 जून : आमची कर्जमाफी आत्तापर्यंतच्या इतिहासातली सर्वात मोठी असेल. थकीतांचीच नाही तर सर्वांचीच कर्जमाफी करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केली. तसंच शेतकऱ्यांचा संप मिटला असला तरी काही लोकांना अराजकता निर्माण करायची आहे असं म्हणत विरोधकांवर टीका केलीय.

शेतकरी संपानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम आयबीएन लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील इतिहासतली सर्वात मोठी कर्जमाफी देण्याची घोषणा केली. तसंच शेतकऱ्यांचा संप मिटला असला तरी काही लोकांना या संपाच्या आडून अराजकता निर्माण करायची आहे असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली.

शेतकऱ्यांचा संप मिटला

शेतकऱ्यांच्या संपाला जेव्हा सुरुवात झाली. तेव्हापासून सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करायला सदैव तयार होतं. त्यानंतर काल शेतकऱी संघटनेच्या नेत्यांनी चर्चेची तयारी दाखवली. त्यानुसार त्यांना रात्री वर्षा बंगल्यावर बोलावण्यात आलं. त्यांनी बैठकीत कर्जमाफीची मागणी केली. सरकारने त्यांची मागणी स्विकारली. पण यासाठी चार महिन्याचा वेळ लागेल. यात अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला प्रथम प्राध्यान्य दिलं जाईल. यूपीमध्येही शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर मोठी व्यवस्था करावी लागली. त्यामुळे या चार महिन्यात एक समिती स्थापन करण्यात येईल ही समिती आपला अहवाल देईल त्यानंतरच 31 आॅक्टोबरच्या आधी कर्जमाफी  देण्याचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

तसंच दूधाच्या दरात वाढीबद्दल दूध संघासोबत बैठक घेऊन 20 जूनच्या आत यावर निर्णय घेण्यात येईल अशी हमी देण्यात आली. तसंच हमीभावापेक्षा कमी भाव दिला तर तो फौजदारी गुन्हा ठरेल असं विधेयक येणाऱ्या अधिवेशनात आणणार आहोत. तसंच वीजेचं बील, थकीत बील एवढंच नाहीतर सगळ्याचं मागण्या मान्य केल्यात. त्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा केली असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला.

Loading...

'संप संपूच नये अशी विरोधकांची इच्छा'

संप मागं घेतल्यानंतर बैठकीला असलेल्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे मोबाईल नंबर व्हायरल करण्यात आले. त्यांना अनेकांनी धमक्या दिल्या. काहींच्या घरावर दगडफेक झाली. मुळात शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या आडून काही लोकांना यश मिळालं नाही. हा संप संपूच नये अशी इच्छाच या लोकांची होती. पण, शेतकऱ्यांना हे सगळं काही माहीत होतं आणि त्यांनी मान्य केलं.

'सर्वात मोठी कर्जमाफी करणार'

आम्ही जी कर्जमाफीची घोषणा करणार आहोत ती महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वात मोठी असणार आहे. यापूर्वी यूपीए सरकारने 7 हजार कोटींची घोषणा केली होती. आम्ही त्यापेक्षाही मोठी कर्जमाफीची घोषणा करणार आहोत. 30 ते 31 लाख शेतकरी हे थकीत आहे. त्यांना मदत मिळावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. याआधी कर्नाटक, तेलंगणा, उत्तरप्रदेशमध्ये अशी कर्जमाफी झालीये. यूपीए सरकारच्या काळातही 30 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. यासाठी समिती स्थापन करण्यात आली या समितीचं कामच असणार आहे की गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

'पुढेही आंदोलन चिंघळवण्याचा प्रयत्न होईल'

आता शेतकऱ्यांनीच कोअर कमिटी स्थापन केली. तीच समिती चर्चेसाठी आली. पण, आता निर्णय झाल्यानंतर हे झालंच कसं ?, असा प्रश्न काही लोकांना पडलाय. ज्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने लूटमार केली. एवढंच नाहीतर काही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या घरात शेतीमाल आढळून आला. आता चांदीची कुऱ्हाड दिली तर सोन्याची का दिली नाही. सोन्याची दिली तर हिऱ्याची का दिली नाही असं विचार राहतील. या लोकांना हा प्रश्न चिघळत ठेवायचाय. पुढेही आंदोलन चिंघळवण्याचा प्रयत्न या लोकांकडून केला जाईल. पण, शेतकरी आमच्यासोबत ते अशा लोकांना साथ देणार नाही असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2017 08:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...