अजून मतदानच झालं नाही, मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीत या 4 मंत्र्यांची नावं!

सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री आपला शब्द पाळतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 01:58 PM IST

अजून मतदानच झालं नाही, मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीत या 4 मंत्र्यांची नावं!

मुंबई 16 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलाय. प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलीय. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज किमान तीन ते चार सभा घेऊन विरोधकांवर हल्लाबोल करताहेत. मतदानाला काही दिवसच राहिले आहेत. 24 ऑक्टोबरला निकाल लागणार आहेत. त्यानंतर ज्या पक्षाला बहुमत मिळेल तो पक्ष सरकार स्थापन करणा आहे. मात्र विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंतच्या प्रचारात चार जणांना मंत्री करणार अशी घोषणाही केलीय. या सर्व लढती भाजपसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी ज्या नावांची घोषणा केली त्यात कर्जत जामखेडमधून - राम शिंदे, माण-खटाव - जयकुमार गोरे, पुसद - निलय नाईक आणि चांदवड - राहूल आहेर यांचा समावेश आहे.

सुप्रीम कोर्टात 'हाय होल्टेज ड्रामा', मुस्लिम पक्षकारांच्या वकिलांनी फाडला नकाशा

कर्जत जामखेडमधून राम शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून रोहित पवार उभे असून या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर विदर्भातल्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या जागेवर नाईक विरुद्ध नाईक अशी लढत होतेय. पुसदमध्ये विद्यमान आमदार मनोहर नाईक यांचा मुलगा इंद्रनील नाईक यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलंय. तर भाजपने त्यांचेच नातेवाईक निलय नाईक यांना मैदानात उतरवलं. सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री आपला शब्द पाळतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. 21 ऑक्टोबरला राज्यातल्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

भाजप आमदार पुत्राचा भर सभेत पाणउतारा, सभा गुंडाळून घ्यावा लागला काढता पाय

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून आश्वासनांची खैरात केली जात आहे. भाजपने मंगळवारी त्यांचे संकल्पपत्र प्रकाशित केलं आहे. 16 कलमी संकल्पपत्रात भाजपने दुष्काळमुक्ती, पाणी, रोजगार, शिक्षण आणि आर्थिक विकास या मुद्यांवर भर दिला आहे. संपन्न, समृद्ध आणि समर्थ महाराष्ट्राचे संकल्पपत्र अशी टॅगलाईन वापरून भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी संकल्पपत्र प्रकाशित केलं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...