News18 Lokmat

VIDEO : उत्तरभारतीयांना धमकावणाऱ्यांना आम्ही जागा दाखवली, मुख्यमंत्र्यांची मनसेवर निशाणा

'महाराष्ट्रामध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर काही लोकं समाजामध्ये तेढ निर्माण करत होते'

News18 Lokmat | Updated On: Jan 24, 2019 09:55 PM IST

VIDEO : उत्तरभारतीयांना धमकावणाऱ्यांना आम्ही जागा दाखवली, मुख्यमंत्र्यांची मनसेवर निशाणा

 मुंबई, 24 जानेवारी : 'उत्तर भारतीय समाज बांधवांना ज्यांनी धमकावलं. त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून दिली' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात 'मुंबईच्या पायाभरणीमध्ये उत्तर भारतीयांचा मोठा वाटा आहे', असं कौतुकही केलं आहे.

मुंबईत उत्तर भारतीय दिवस कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी उत्तर भारतीयांचं कौतुक करत विरोधकांवर जोरदार टीका केली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'महाराष्ट्रामध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर काही लोकं समाजामध्ये तेढ निर्माण करत होते. जे आमचे उत्तर भारतीय समाज बांधव आहे. त्यांना धमकावत होते. पण आम्ही गेल्या साडेचार वर्षांमध्ये अशा लोकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.' तसंच 'योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशला उत्तम राज्य बनवलं आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचं नातं हे दोन भावाचं आहे', असंही मुख्यमंत्री म्हणाले आहे.

'मुंबईही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईच्या या पायाभरणीमध्ये उत्तर भारतीयांचं मोठं योगदान आहे',असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहे.

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात रसायन हल्ला करण्याचा संशयित दहशतवाद्याचा प्रयत्न होता. यावर योगी आदित्यनाथ यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली.'बरं झालं, देवेंद्र फडणवीस तुम्ही कुंभमेळ्यात येणाऱ्या दहशतवाद्यांना महाराष्ट्रमध्ये पकडलं, जर ते उत्तर प्रदेशमध्ये आले असते तर आम्ही त्यांचं सीमेवरच कांड केलं असतं', असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

Loading...

तसंच 'महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये दंगली बंद झाल्या आहे. कारण, आम्ही त्यांचा दोन्ही ठिकाणी बंदोबस्त केला. आम्हाला शांतता राखताही येते आणि क्रांती सुद्धा करता येते', असंही ते म्हणाले.

मनसेचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यांनी उत्तर दिलं आहे. 'मुख्यमंत्र्यांना उत्तरभारतीयांचं लांगुलचालन करायचं असेल तर करावं. मुळात उत्तरभारतीयांची मतं मिळवण्यासाठी मुख्यमंत्री हे मैदानात उतरले आहे. त्यांनी काय जागा दाखवली, हे भाषणातून सांगून होतं नाही. मुळात त्यांच्यात तेवढी हिंमत नाही', अशी टीका त्यांनी केली.


================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2019 09:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...