भाजपच्या गोटात हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री कुठला नवा प्रस्ताव देतात यावरच पुढच्या घडामोडी अवलंबून आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 01:39 PM IST

भाजपच्या गोटात हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

विवेक कुलकर्णी, मुंबई 5 नोव्हेंबर : महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेचा पेच आता निर्णायक वळणावर आला आहे. दिल्लीतून मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तातडीची बैठक बोलावलीय. वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार असून त्याला भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शिवसेनेसोबत निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्रिपदाशिवाय काहीही नको. अडीच वर्ष मान्य असेल तरच चर्चेला बसू असं शिवसेनेने सांगितल्याने दोन्ही पक्षांमधली चर्चा थांबली आहे. त्यामुळे ही कोंडी फोडायची कशी असा प्रश्न निर्माण झालाय. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन चर्चा केली होती.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत नवीन सरकार स्थापन करू शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जातेय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ही कोंडी फोडण्यासाठी हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. थायलंडमधल्या 'आरसेप' परिषदेला उपस्थित राहून पंतप्रधान रात्री उशीरा दिल्लीत दाखल झालेत. त्यामुळे आज दिल्लीतून मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे.

सत्तास्थापनेची कोंडी फोडण्यासाठी शिवसेनेच्या 'या' नेत्याचं सरसंघचालकांना साकडं

राष्ट्रवादी-शिवसेनेची जवळीक, भाजपच्या गोटात चिंता

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या योजनेवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती 'News18इंडियाला' विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. पवारांनी सोनियांना सत्ता स्थापनेसाठी काय पर्याय असू शकतात आणि त्यासाठी कसं पुढे जायचं याची माहिती सोनियांना दिलीय. यावर सोनिया गांधींनी विचार करून पुन्हा भेटू असं पवारांना सांगितल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगिलंय. त्यामुळे पुढचे काही दिवस राज्याच्या राजकारणात अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत.

Loading...

'News18इंडियाला' विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार हे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याचा प्रस्ताव देऊ शकतात. शरद पवारांना असं वाटतं की भाजप मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देणार नाही आणि शिवसेना ते सोडायला तयार होणार नाही. उपमुख्यमंत्रिपद शिवसेना स्वीकारण्यास राजी होणार नाही. त्यामुळे सेनेला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्यास शिवसेना तयार होईल अशी शक्यता आहे.

शरद पवार म्हणाले, मी मुख्यमंत्री होणार नाही पण...

असं करायचं असेल तर आधी शिवसेनेने NDA सोबतचे संबंध तोडावे असं सोनिया गांधींना वाटतंय. काँग्रेसला देशव्यापी राजकारण करायचं असल्याने शिवसेनेने कुठल्या मुद्यावर जहाल भूमिका घेऊ नये याची काळजी शरद पवारांनी घ्यावी असंही सोनियांनी सूचविल्याची माहिती आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यास काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देईल मात्र सरकारमध्ये सामील होणार नाही असंही काँग्रेसने पवारंना सांगितल्याची माहिती 'News18इंडियाला'मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 01:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...