'युती'साठी आता 24 तास महत्त्वाचे, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये थेट वाटाघाटी

'युती'साठी आता 24 तास महत्त्वाचे, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये थेट वाटाघाटी

गेली काही दिवस दोनही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती मात्र त्यात फारशी प्रगती झालेली नाही. आता वेळही कमी असल्याने मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच वाटाघाटीच्या टेबलवर एकत्र आले आहेत.

  • Share this:

विवेक कुलकर्णी मुंबई 23 सप्टेंबर : 'युती' होणार हे आता नक्की असलं तरी जागावाटपाचं सूत्र काय राहिल याची उत्सुकता आता निर्माण झालीय. तुटेपर्यंत ताणलं गेलं नाही तर तोगडा निघणार आहे. मात्र जास्तच ताणलं गेलं तर चर्चा फिस्कटू शकते. पण त्याची शक्यता फार कमी असल्याचं बोललं जातय. मंत्रिस्तरावर तोडगा निघाला नसल्यानं आता थेट उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाटाघाटी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मंगळवारपर्यंत तोडगा निघू शकतो अशी शक्यताही व्यक्त केली जातेय. गेली काही दिवस दोनही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती मात्र त्यात फारशी प्रगती झालेली नाही. आता वेळही कमी असल्याने मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच वाटाघाटीच्या टेबलवर एकत्र आले आहेत.

मंत्रालय म्हणजे आत्महत्या करण्याची जागा झालीय, अजित पवारांचा घणाघात

युतीच्या जागावटापात 50-50च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र शिवसेना कमी जागा घ्यायला राजी झाली नाही. बदलती राजकीय परिस्थिती इतर पक्षांमधल्या नेत्यांचं भाजपमध्ये येणं. लोकसभेनंतर वाढलेली ताकद यामुळे जास्त जागा मिळाव्यात अशी भाजपची मागणी आहे. तर 50 टक्क्यांपेक्षा कमी जागा घ्यायला शिवसेना तयार नाही.

लोकसभा निवडणुकीत भाजपने तडजोड करत एक जागा शिवसेनेला दिली होती. त्यामुळे तोच लवचिकपणा विधानसभेत शिवसेनेने दाखवावा अशी अपेक्षाही भाजपची आहे. भाजपने जो अंतर्गत सर्व्हे केला त्यात स्वबळावर सत्ता मिळू शकते असं दिसून आल्याने भाजपचा आत्मविश्वास बळवला आहे. मात्र दिर्घपल्ल्याच्या राजकारणाचा दृष्टिकोन मुख्यमंत्र्यांचा असल्याने ते तडजोड घडवून आणतील अशीही शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

'दाऊदचे लोक भाजपमध्ये... हा खासदार जेजे हत्याकांडातील आरोपी'

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची केमेस्ट्री चांगली असल्याने एक दोन दिवसांमध्ये तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आता शिवसेनेला गरज असून भाजप सेनेवरचा दबाव कायम ठेवतेय. गेल्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे महाराष्ट्रात होते. त्यांची जाहीर भाषणही झालीत मात्र त्या भाषणांमध्ये त्यांनी युतीचा उल्लेखही केला नाही. उलट अमित शहा यांनी जे काही होईल किंवा होणार नाही अशा कुठल्याही परिस्थितीत भाजपचाच विजय होणार असं सांगून भाजपची भूमिका ठाम असल्याचे संकेत शिवसेनेला दिले होते. त्यामुळे पुढच्या 24 तासांमध्ये काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 06:37 PM IST

ताज्या बातम्या