युद्ध बदलले की शस्त्रे बदलावी लागतात; मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र!

युद्ध बदलले की शस्त्रे बदलावी लागतात; मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र!

युद्ध बदलले की शस्त्रे बदलावी लागतात, रणांगण बदललं की रणनीती बदलावी लागते, अशा शब्दात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.

  • Share this:

मुंबई, 21 जुलै: युद्ध बदलले की शस्त्रे बदलावी लागतात, रणांगण बदललं की रणनीती बदलावी लागते, अशा शब्दात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. मुंबईत भाजपच्या कार्यकारणी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला प्रकर्षाने गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची आठवण येत असल्याचे सांगितले. आजचे पक्षाचे यश पाहायला हे दोघेही हवे होते असे फडणवीस म्हणाले. तसेच रावसाहेब दानवे यांनी केलेल्या कामाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. गेल्या 5 वर्षात पक्ष आणि सरकारमध्ये उत्तम समन्वय होता असे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री

- चंद्रकांत पाटील दादा यांचे सगळे आयुष्य संघटनेच्या कामात गेलंय. त्यांनी राज्याच्या कानाकोप-याच जाऊन काम केलंय

- गेल्या ५ वर्षात अनेक संकटं राज्यात आली. पण प्रत्येक संकटाला आपण सकारात्मक पणे समोर गेलो. दादा मगाशी म्हणालेत की तुमच्याकडे काही दैवी शक्ती आहे का ? होय माझी दैवी शक्ती माझ्यासमोर आहे, जनता माझी दैवी शक्ती आहे. मला गमावण्यासारखं काहीच नाहीये. माझे कोणतेही कारखाने नाहीयेत. आधीच्या मंत्र्याचा ९० टक्के वेळ त्यांच्या संस्थांच्या कामाबद्दल जायचा. माझा संपूर्ण वेळ लोकांसाठी आहे.

- गेल्या सरकारकडून अपेक्षा नव्हती, आमच्याकडून अपेक्षा म्हणून आमच्या काळात सर्वाधिक मोर्चे निघालेत.

- आम्ही फक्त प्रश्नांची दखल घेतली नाही तर त्यांचं उत्तरही शोधलं याचा मला अभिमान आहे. ही तर आपली सुरु आहे. राज्याची घडी आपण बसवली आहे. दुष्काळ, शेतीचे आव्हान आहे. म्हणून पुन्हा एकदा नव्या दमाने उतरावं लागणार आहे. लोकसभेत मोठा विजय मिळाला असल्यामुळे अनेकदा कार्यकर्त्यांना वाटतं की आपला आता विधानसभेत विजय निश्चित आहे. ज्यांना असं वाटतं, लोकांना जे गृहीत धरतात त्यांचे अध:पतन निश्चित असतं.

- मोदी विजयाच्या दुस-या दिवशीच कामाला लागतात. मोदींनी १०० दिवसांचा आराखडा तयार केला होता. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे अभिमान असू देत पण गर्व नको.

- लोकसभा वेगळी आणि विधानसभा वेगळी. प्रत्येक युद्धाची तयारी वेगळी असते.

- पहिले पाऊल कोणं टाकणार हे महत्त्वाचे आहे, तुम्हाला काय माहिती हे महत्त्वाचे नाहीये

- युद्ध बदललं की शस्त्रं बदलावी लागतात, रणांगण बदललं की रणनीती बदलावी लागते, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

- आपलं दैवत महाराष्ट्राची जनता आहे, त्यांचे दर्शन घेण्यासाठी महाजनादेश यात्रा आहे

- सामान्यतल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी ही यात्रा आहे. ही फक्त भाजपची यात्रा नाहीये, सर्वसामान्यांची यात्रा आहे. यात्रेसाठी सुक्ष्म नियोजन करावं लागेल.

- शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला होता. आपल्याला भ्रष्ट व्यवस्थेचा कोथळा काढायचाय.

- राज्यातील दुष्काळ पूर्णपणे संपलेला नाहीये. दुष्काळात कितीही मदत केली तरीही शेतक-याला, शेत मजुराला त्याच्या झळा बसताताच. पूर्वी काही लोकांकरता दुष्काळ हा सुकाळ असायचा. शेतक-यांचा योजना लुटल्या जायच्या.

- ईश्वराला प्रार्थना आहे की चांगला पाऊस पडू देत. महाजनादेश यात्रा जरी सुरु असेल तरीही सरकारचं काम सुरु असेल.

- आपण इलेक्शन मोडमध्ये असलो तरी आपलं समाजभान जागृत असलं पाहिजे

- पाण्याचं नियोजन करुन आपल्याला दुष्काळाला भूतकाळ करायचाय. या पिढीने दुष्काळ भोगला पण पुढच्या पिढीला दुष्काळ भोगू दिला जाणार नाही. यावर आमचा पुढील ५ वर्ष फोकस

- येणारी निवडणूक युतीतच आपण लढणार आहोत. जागा वाटपाचा निर्णय अजून पूर्ण झालेला नाहीये, तो लवकरच पूर्ण करु.

- मुख्यमंत्री वगैरे वाद विवादात काही पडण्याची गरज नाहीये. मुख्यमंत्री जनता ठरवते. आपल्या मित्रापक्षाकडे यावर बोलण्याची खूमखूमी अनेकांना आहे. आपल्याकडेही आहेत पण कमी आहे. मी तर सांगितलं आहे की मी पुन्हा येणार आहे. मी फक्त भाजपचा थोडीये, शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे, आरपीआयचाही देखील आहे.

- आपण मुख्यमंत्री पदाकरता थोडीच काम करतो, लोकांसाठी करतो

- भारताच्या सुवर्ण काळात काम करण्याची संधी आपल्याला मिळतीये. मुख्यमंत्री पद सोडा, मला खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली तरी मी स्वत:ला धन्य मानेल.

- भाजप प्रायव्हेट लिमिटेड पक्ष नाहीये तर अनलिमिटेड पक्ष आहे. याचा अर्थ सरसकट सगळ्यांना घेणार असं नाहीये. काल पक्षाध्यक्ष म्हणाले एक तर एखादा जण भाजपात येतो किंवा मग राजकारणातून बाहेर जातो. आपण फक्त १५ टक्के जण बाहेरुन येतो त्याची काळजी करु नये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 05:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading