News18 Lokmat

मुख्यमंत्री फडणवीस बिझी; शरद पवारांना CMOने अद्याप दिली नाही वेळ!

दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत करण्यासंदर्भात शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितली आहे. पण

News18 Lokmat | Updated On: May 27, 2019 12:47 PM IST

मुख्यमंत्री फडणवीस बिझी; शरद पवारांना CMOने अद्याप दिली नाही वेळ!

मुंबई, 27 मे: निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर सर्व राजकीय नेते दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. राज्य मंत्रिमंडळाने देखील यासंदर्भात मंत्री आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. राज्यातील मतदान संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दुष्काळी भागाचे दौरे केले होते. या दौऱ्यानंतर दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत करण्यासंदर्भात शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितली आहे. पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यांना वेळ दिलेली नाही.

दुष्काळाबरोबरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. पण मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या नियोजित कार्यक्रमात व्यस्त आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप पवारांना भेटीसाठी वेळ दिलेली नाही. दुष्काळ निवारणाबाबत शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटून सरसकट कर्जमाफीची विनंती करणार आहेत. केंद्रात काळजीवाहू सरकार असल्यानं नवीन सरकार स्थापन झाल्यावर सरसकट कर्जमाफीची विनंती करणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटलंय.

दुष्काळाबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार आज (सोमवारची) वेळ मुख्यमंत्र्यांकडून मागितली होती. या भेटीत ते सरसकट कर्जमाफी करण्याची करणार विनंती करणार आहेत. पण अद्याप CMOकडून त्यांना वेळ देण्यात आलेली नाही.


SPECIAL REPORT: काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी?

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2019 12:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...