पुन्हा मुख्यमंत्री बनल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा आले जनतेसमोर

पुन्हा मुख्यमंत्री बनल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा आले जनतेसमोर

मोदीजी है तो मुमकीन है... अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी...

  • Share this:

मुंबई,23 नोव्हेंबर: भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री बनल्यानंतर पहिल्यांदा जनतेसमोर आले. भाजप कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी मोठा जल्लोष केला.'फडणवीस-पवार आगे बढो महाराष्ट्र आपके साथ है', अशा घोषणा दिल्या.

आपली बांधीलकी महाराष्ट्राशी..

अजित पवारांच्या समर्थनातून मजबूत सरकार देण्याचा भाजपने निर्णय घेतल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले. आपली बांधीलकी महाराष्ट्राशी असून आपले सर्व मित्र आपल्यासोबत असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

मोदीजी है तो मुमकीन है...

मोदीजी है तो मुमकीन है... अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

भिवंडीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष...

भिवंडी शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या तालावर नाचत, महिलांनी फुगडी घालत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला आहे.

चिपळूणमध्ये जल्लोष..

देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर चिपळूनमधील बहादूरशेख नाका येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत जल्लोष केला.

कोपरगावातही कोल्हे समर्थकांचा जल्लोष

देवेंद्र फडणविस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कोपरगावमध्येही माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी समर्थकांसह रँली काढून आनंदोत्सव साजरा केला.. फटाके फोडुन जल्लोष साजरा केला करत एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विजयाच्या घोषणा दिल्या...

शिर्डीतही जल्लोष

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याभरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. साई बाबांच्या शिर्डीतही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. द्वारकामाई मंदिरासमोर भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर राज्यभरातून आलेल्या साईभक्तांना लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. भाजप कार्यकत्यांनी फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2019 04:49 PM IST

ताज्या बातम्या