मोठा अनर्थ टळला, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टराची चाकं चिखलात रुतली

लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील चिखलात हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 06:39 PM IST

मोठा अनर्थ टळला, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टराची चाकं चिखलात रुतली

मोहन जाधव,(प्रतिनिधी)

रायगड,11 ऑक्टोबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला शुक्रवारी पेण येथे अपघात होता होता वाचला. पेण येथे प्रचार सभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील चिखलात हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले. मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा नियंत्रण प्राप्त केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे पीए, एक इंजीनिअर, एक पायलट आणि को-पायलट हे पाचजण बसले होते. हेलिगो चार्टर प्रा.लि.चे हे हेलीकॉप्टर होते.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सभा संपवल्यावर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना झाले. पाऊस पडल्याने हेलिपॅडवर चिखल झाला होता. त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅड चिखलासारखे झाले असावे. 4 वाजून 25 मिनिटे आणि 30 सेकंदानी पेण-बोरगाव येथे सात टन वजनाचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याचे बोलले जाते. त्यामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटण्याच्या स्थितीत असतानाच पायलटने त्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर सुखरुपपणे मुख्यमंत्री खाली उतरले आणि पेण येथील भाजपाचे उमेदवार रवींद्र पाटील यांच्या प्रचारसभेसाठी रवाना झाले. या घटनेबाबत अद्यापही कोणत्याच यंत्रणेने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, या आधीही मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातून ते बालंबाल बचावले होते. आता पुन्हा असाच अपघात होताना ते बचावले आहेत.

हेलिकॉप्टर लॅण्ड होताना असे प्रकार होतात. त्यामुळे अपघात झालेला नाही. मुख्यमंत्री सुरक्षित खाली उतरले आणि पुन्हा काम संपवून परतले आहेत, असे जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नाणारबद्दल बोलताना सेनेच्या ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली, पाहा हा VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 06:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...