मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये बंद दाराआड चर्चा, युतीचा पोपट जिवंत?

मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये बंद दाराआड चर्चा, युतीचा पोपट जिवंत?

या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील युतीबाबत चर्चा झाली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे. त्यामुळे युतीचा पोपट अजूनही जिवंत आहे का, ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या स्मारकाचं गणेशपूजन झालं. यावेळी हे दोन नेते एकत्र आले होते. यावेळी इतरही आमदार आणि मंत्री उपस्थित होते. पण मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या चर्चेवेळी इतर सर्वजण बाहेरच थांबल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील युतीबाबत चर्चा झाली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

फडणवीस-उद्धव याआधीही भेट?

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये गुप्त भेट झाली, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. 'उद्धव ठाकरे यांनी दुपारी मोदींविरोधात भाषण केले आणि रात्री सोफिटेल हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर नाक घासत गेले,' अशा तिखट शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली होती.

'भाजपच्या विरोधात दुपारी शिव्या घालायच्या आणि नाक घासत रात्री मुख्यमंत्र्यांना भेटायचं, हे बंद करा,' अस म्हणत जयंत पाटील यांनी शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असल्याचं म्हटलं होतं.

VIDEO : खून करायचा का माझा? जयंत पाटलांसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची

First published: January 23, 2019, 1:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading