मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /"मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, सामान्य मुंबईकरांना ऑफिसला जावे लागते, लोकल सुरू करा"

"मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, सामान्य मुंबईकरांना ऑफिसला जावे लागते, लोकल सुरू करा"

BJP demands start local train for all Mumbaikars: मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करा, भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

BJP demands start local train for all Mumbaikars: मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करा, भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

BJP demands start local train for all Mumbaikars: मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करा, भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

मुंबई, 28 जुलै: महाराष्ट्रात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होत असून आता लोकल ट्रेन (Mumbai Local Train) सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मुंबईकरांना (Mumbaikar) कार्यालय गाठण्यासाठी लोकल ट्रेन हा स्वस्त आणि वेळ वाचवणारा असा पर्याय आहे. त्यामुळे लवकरात लवकर लोकल सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनांसोबतच सामान्य नागरिकही करत आहेत. आता भाजपने (BJP) सुद्धा तातडीने निर्बंध शिथील करुन लोकल प्रवासाची सर्वांना परवानगी देण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करत म्हटलं, "आज मंत्रिमंडळाची बैठक आहे. आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? मुख्यमंत्री #workFromHome करू शकतात पण मुंबईकरांना ॲाफिसलाजावेच लागते. लोकलप्रवासबंदीमुळे जनतेत असंतोष आहे. उद्रेक होण्यापूर्वी राज्यसरकारने तातडीने निर्बंध शिथील करून लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू करावा"

VIDEO: 'मी काय कुंद्रा आहे का?' राज ठाकरेंची पुण्यात मिश्किल टिप्पणी, पाहा नेमकं काय घडलं

त्यांनी पुढे म्हटलं, "मागचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष शाळांअभावी वाया गेल्याने पालक व विद्यार्थी चिंताग्रस्त असून घरबसल्या शिक्षणाचा खर्चही विनाकारण वाढत आहे. अकरावी प्रवेशाचा घोळ अजूनही सुरूच असून कोविड संसर्ग कमी होत असल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा."

मुख्यमंत्र्यांनी तब्बल ‘दोन तासाचा’ प्रत्यक्ष पाहणी करूनही अतिवृष्टी व दरडी कोसळण्यामुळे संकटग्रस्त असलेल्या जनतेस अद्यापही सरकारने कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. संकटग्रस्त जनतेसाठी कारण न शोधता तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करून पुनर्वसनाची प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्यात यावी असंही त्यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Mumbai, Mumbai local