मुंबई पालिकेच्या बंद दाराआड मनसेचे नगरसेवक फोडले ?

मुंबई पालिकेच्या बंद दाराआड मनसेचे नगरसेवक फोडले ?

मुंबई पालिका मुख्यालयाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. माॅक ड्रिलचं कारण सांगत सर्व दरवाजे बंद केले होते.

  • Share this:

13 आॅक्टोबर : सत्तेची खुर्ची धोक्यात आल्याची जाणीव होताच सेनेनं मास्टरस्ट्रोक लगावत मनसेचे सात नगरसेवक फोडले. पण दुसरीकडे ही घडामोड सुरू असताना मुंबई पालिका मुख्यालयाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. माॅक ड्रिलचं कारण सांगत सर्व दरवाजे बंद केले होते.

भांडूप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर सत्तेच्या समिकरणात बदलणार हे निश्चित झालं होतं. आता भाजपची संख्या 85 तर सेनेची संख्या 88 आहे. त्यामुळे सेनेनं अगोदरच खबरदारी घेत मनसेचे सातही नगरसेवक आपल्या ताब्यात घेतले. हे घडत असताना अचानक संध्याकाळी  मुंबई मनपा मुख्यालयाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. दरवाजे बंद केल्यानं एकच गोंधळ उडाला. जेव्हा विचारणा करण्यात आली तर मॉक ड्रिलचे कारण सांगण्यात आलं. पण, जेव्हा कधी माॅक ड्रिल होत असते तेव्हा सर्व दरवाजे बंद उघडे ठेवण्याचा नियम आहे. मग नेमकं कोणती माॅक ड्रिल पालिका मुख्यालयात सुरू होती ?, आताच दरवाजे बंद करण्याचे खरं कारण काय ?, शिवसेनेचा हा रडीचा डाव आहे काय ?, बीएमसीत बंद दरवाजाआड काय चाललंय ? असं प्रश्न आता निर्माण झाले आहे.

First published: October 13, 2017, 5:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading