मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यातले मदरसे बंद करून खरे हिंदुत्ववादी असल्याचं दाखवा, भाजप नेत्याचं CM ठाकरेंना आव्हान

राज्यातले मदरसे बंद करून खरे हिंदुत्ववादी असल्याचं दाखवा, भाजप नेत्याचं CM ठाकरेंना आव्हान

'मदरसे आणि मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवून मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरुपात थेट मदत करावी.'

'मदरसे आणि मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवून मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरुपात थेट मदत करावी.'

'मदरसे आणि मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवून मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरुपात थेट मदत करावी.'

मुंबई 15 ऑक्टोबर: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिवसेनेला खिंडीत पकडण्यासाठी भाजप एकही संधी सोडत नाही. आसाममधल्या भाजप सरकारने तिथले सगळे मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले सगळे मदरसे बंद करून खरे हिंदुत्ववादी असल्याचं दाखवून द्या अशी मागणी भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

भातखळकर म्हणाले, मदरश्यांमध्ये कोणतंही आधुनिक शिक्षण न देता एका विशिष्ट धर्माचे शिक्षण दिले जाते यावर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात.  मदरसे आणि मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवून मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरुपात थेट मदत करावी अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

मदरश्यांमध्ये धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली कट्टरतावादाचं शिक्षण दिलं जातं असा आरोप भाजप सातत्याने करत आला आहे. राज्यात शिवसेनेने वेगळी वाट निवडल्याने दुखावला गेलेला भाजप सातत्याने आता शिवसेना हिंदुत्वाबाबात प्रश्न विचारत आहे. त्यातच राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातली मंदिरे उघडण्याची मागणी केली होती. त्याच बरोबर तुम्ही हिंदुत्व सोडून धर्मनिरपेक्ष झाला आहात का? असा खोचक सवालही केला होता. त्यावरून राज्यात वादळ निर्माण झालं होतं.

VIDEO: पुण्यात पुराच्या पाहणीदरम्यान सुप्रिया सुळेंसमोर ओक्साबोक्शी रडली महिला

आमचं हिंदुत्वा हे बेगडी नाही. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर असं म्हणणाऱ्यांचं हसत स्वागत करणं हे आमच्या हिंदुत्वात बसत नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना कडक भाषेत उत्तर दिलं होतं.

मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देत राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून राज्यपालांबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

शरद पवार आपल्या पत्रात म्हणतात, महाराष्ट्र सध्या कोरोनाविरुद्ध निकराची झुंज देत आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कोरोनाला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत गर्दीची ठिकाणं लगेच खुली करणं योग्य होणार नाही. राज्यात अशी बिकट परिस्थिती असताना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपलं मत व्यक्त केलं आहे.

राज्यपालांनी ज्या तत्परतेनं आपलं मत मांडलं ते स्वागतार्ह आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये मोकळा संवाद असायलाच पाहिजे. मात्र राज्यपालांनी जी भाषा वापरली ती वाचून मला धक्का बसला आणि मी आश्चर्यचकीतही झालो आहे.

सॅनिटाझरमुळे कारमध्ये अग्नितांडव, NCP नेता संजय शिंदे यांचा होरपळून मृत्यू

राज्यपाल हे घटनात्मक पद असून त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरणं हे योग्य नाही. त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र ज्या पद्धतीची भाषा वापरली गेली ती त्या पदाला शोभणारी नाही.

घटनात्मक पदाचा मान राहिला गेला पाहिजे. या पत्रामुळे मला अतिशय दु:ख झाले आणि ते तुमच्याजवळ मला व्यक्त करावं वाटलं, असंही पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

First published:

Tags: Uddhav thackeray