धक्कादायक! केईएम रुग्णालयातील NICU मधील स्वच्छता कर्मचारी कोरोनाबाधित

मेडिकल प्रक्रियेदरम्यान आरोग्य कर्माचाऱ्यांचा रुग्णांशी सर्वाधिक संपर्क येतो. त्यामुळे इतर कोणत्याही मास्कपेक्षा हे मास्क अधिक उपयुक्त ठरतात.

धक्कादायक बाब म्हणजे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये बुधवारी पुन्हा तीन कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

  • Share this:
मुंबई, 8 एप्रिल: मुंबईतील प्रसिद्ध केईएम रुग्णालयातील Neonatal Intensive Care Unit (NICU) मधील स्वच्छता कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णाचं वय 50 असून तो धारावीतील मुस्लिम नगरमधील रहिवासी आहे. त्यांच्या संपर्कातील अतिसंशयीत 5 जणांना धारावी येथील राजीव गांधी स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 10 झाली आहे. हेही वाचा..VIDEO : कोरोनाशी लढणाऱ्या नर्स आणि तिच्या मुलीचे अश्रू पाहून डोळ्यात येईल पाणी दरम्यान, राज्यात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा एक हजारांवर गेला आहे. सर्वात जास्त जवळपास 800 हून अधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आशियातील सर्वात मोठी झोडपट्टी असलेल्या धारावीमध्ये बुधवारी पुन्हा तीन कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 होती. त्यात बुधवारी आणखी तीन रुग्णांची भर पडली आहे. ही संख्या आता 10 झाली आहे. दरम्यान, धारवीतील कोरोनाग्रस्ताचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. दुसरीकडे, वरळी कोळीवाडा, वरळी, लोअर परेल आणि धारावीतील काही भाग संपूर्ण सील करण्यात आला आहे. तिथल्या नागरिकांना घरात क्वारंटाइन करण्यात आलं आहे. नागरिकांना बाहेर पडण्याची मनाई केली जात आहे. हेही वाचा..निझामुद्दीन मरकज कार्यक्रमावरून राज्य गृहमंत्री संतापले, अमित शहांना केला सवाल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  काही दिवसांपूर्वी तबलिगी जमातचे 6 जण धारवी इथे राहण्यास आले होते. 23 मार्चनंतर त्यातील 4 जण केरळला गेले. त्यामुळे उरलेल्या दोन तबलिगी जमातच्या लोकांचा शोध सुरू आहे. तसंच तबलिगी कनेक्शन काही आहे का?याचाही तपास केला जात आहे. भीतीदायक गोष्ट ही की धारावीत आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. त्यामुळे इथे कोरोना व्हायरस वेगानं फोफावण्यास वेळ लागणार नाही. हा संसर्ग या परिसरात रोखण्याचं प्रशासनापुढे सर्वात मोठं आणि जोखमीचं आव्हान आहे. 25 आणि 35 वर्षाचे दोन तरुण आहेत. 25 वर्षाचा तरुण हा राजीव कॉप्लेक्सजवळ राहातो. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्यानं त्यालाही कोरोनाची लागण झाली होता. तर 35 वर्षीय तरुण हा धानवडा चाळ इथे राहणारा आहे. जे दोन्ही तरुण ज्या भागांमध्ये सापडले तो परिसर प्रशासनाकडून बंद करण्यात आला असून घरात सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. संपादन- संदीप पारोळेकर
First published: