कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, एकनाथ शिंदेंचा इशारा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 12, 2017 11:59 AM IST

कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, एकनाथ शिंदेंचा इशारा

12 मे : तूर खरेदीसंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन डोंबिवलीत भाजप-शिवसेना आमनेसामने आली आहे. भाजपने शिवसेनेच्या शहरप्रमुखाला काळं फासण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेनेने भाजप कार्यालयावर दगडफेक केल्याची माहिती आहे. दरम्यान, दोन दिवसात पोलिसांनी जर कारवाई केली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

डोंबिवलीत शिवसेनेनं दानवेंच्या पुतळ्याची थेट गाढवावरुन धिंड काढत जोडे मारो आंदोलन केलं. शिवसेनेच्या या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपनं 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राच्या काही प्रतींची होळी केली. तसंच शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊ चौधरी यांच्या चेहऱ्याला काळं फासण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेनेने भाजप कार्यालयावर दगडफेक केल्याची माहिती आहे. याप्रकरणी शाई टाकणे, दबाव आणणे असा महेश पाटील आणि 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे शहरातील शिवसेना-भाजपमधील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी दावनेंच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 11:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...