5 वर्षांच्या मुलांना 20 फुटांवर नेणं हा कोणता साहसी क्रीडाप्रकार?,कोर्टाचा सवाल

5 वर्षांच्या मुलांना 20 फुटांवर नेणं हा कोणता साहसी क्रीडाप्रकार?,कोर्टाचा सवाल

"साहसी क्रीडा प्रकाराची तुमची व्याख्या काय असा सवालही कोर्टाने सरकारला विचारला आहे"

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

17 जुलै : दहीहंडीचे मनोरे रचताना ५ वर्षांच्या मुलांना २० फुटांवर नेणं हा कोणता साहसी क्रीडाप्रकार आहे असा सणसणीत सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे.

साहसी क्रीडा प्रकाराची तुमची व्याख्या काय असा सवालही कोर्टाने सरकारला विचारला आहे आणि त्यावर आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितलंय.

राज्यसरकारने दहिहंडीला साहसी खेळ घोषित करण्याची मागणी केली होती. त्याला सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी विरोध करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. दहिहंडीत लहान मुलांचा समावेश करण्याला त्यांनी विरोध केला होता. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

इतकंच नाही तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी यापुढे दहीहंडीच्या कार्यक्रमाला जाताना काळजी घ्यावी, असं न्यायालयाने भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना सुनावलं.

First published: July 17, 2017, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading