नवी मुंबईत थरार! सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या

नवी मुंबईत थरार! सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या

लॉकडाऊनमध्ये नवी मुंबईतील रबाले तळवली येथे थरार पाहायला मिळाला आहे.

  • Share this:

विनय म्हात्रे

नवी मुंबई, 4 जून: लॉकडाऊनमध्ये नवी मुंबईतील रबाले तळवली येथे थरार पाहायला मिळाला आहे. एका सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, प्रवीण तायडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. प्रवीण तायडे हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आणि मटेरियल सप्लायर होते. तळवली येथे गुरूवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान तायडे यांची हत्या करण्यात आली. प्रवीण तायडे हे स्कूटीवरून मित्रासोबत जात असताना त्यांच्यावर तीन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या. यावेळी एक प्रवीण तायडे यांच्या डोक्यात लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. मारेकऱ्यांनी फायरिंग केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला आहे. घटनास्थळी रबाले पोलिस पोहोचले आहे. आरोपी फरार असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

व्यावसायिक स्पर्धेतून हत्या...

दरम्यान, नवी मुंबईतील घणसोली, तळवली येथे गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात इमारती बांधकाम सुरू आहे. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धेतून प्रवीण तायडे यांची हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हत्येमागे काही पूर्ववैमनस्य आहे का? याबाबतही पोलिस चौकशी करत आहेत.

अन्य बातम्या

कोरोनामुळे बदललं हॉटेल्स-रेस्टॉरंट्सचं रूप, पाहा PHOTO

पंतप्रधान ठरले सुपरहिट! नरेंद्र मोदींच्या 4 मास्टरस्ट्रोकमुळे चीनने घेतली माघार

शाळा सुरू करणं या देशाला पडलं महागात; 250 मुलं कोरोनाग्रस्त, 6800 जण क्वारंटाइन

First published: June 4, 2020, 9:53 PM IST
Tags: crime

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading