Home /News /mumbai /

कोकणात अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ; आंबा, काजू बागायतदारांचं मोठं नुकसान

कोकणात अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ; आंबा, काजू बागायतदारांचं मोठं नुकसान

गाऱ्यांच्या जोरदार माऱ्यामुळे आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

    रत्नागिरी, 22 एप्रिल : रत्नागिरीमधील (Ratnagiri News) संगमेश्वर येथे गारांचा पाऊस पडल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दुसरीकडे चिपळूण मधील खेरशेत नायशी कोकरे भागातही गारांच्या पावसाचा तडाखा सहन करावा लागत आहे. गाऱ्यांच्या जोरदार माऱ्यामुळे आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या जोरामुळे मोठ्या प्रमाणात आंबे गळून पडले आहेत. असह्य उष्णतेमुळे त्रासलेले नागरिक सुखावले असले तरी बागायतदारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. ऐन हंगामात आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर आंबा उत्पादनाची मोठी चिंता निर्माण झाली आहे. हे ही वाचा-Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र ते मराठवाडा, अवकाळी पावसाचा अंदाज, वीजाही चमकणार, वेगाने वारेही वाहणार दुसरीकडे चिपळूणमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊसाला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. विजांचा कडकडाट आणि गारांच्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. चिपळूणसह संगमेश्वर आणि गुहागरमधील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. गुहागरमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rain, Ratnagiri

    पुढील बातम्या