सिडकोची नवी मुंबईत 86 हजार 700 घरांची बंपर लॉटरी, असा भरा फॉर्म

घरांच्या सोडतीमध्ये सर्व प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असल्याने लोकांनी एजंट्च्या अमिषांना बळीपडू नये असं आवाहन करण्यात आलंय.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 04:32 PM IST

सिडकोची नवी मुंबईत 86 हजार 700 घरांची बंपर लॉटरी, असा भरा फॉर्म

मुंबई 12 जुलै : मुंबईत घरं घेणं म्हणजे स्वप्न असतं. सर्व सामान्यांना मुंबईत घर घेणं परवडत नाही. त्यामुळे सिडको आणि म्हाडा घरांसाठी लॉटरी काढत असतात. ऑगस्ट महिन्यात सिडको घरांसाठी लॉटरी काढणार असून ही लॉटरी तब्बल 86 हजार 700 घरांची लॉटरी निघणार आहे. याचा आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना फायदा होणार आहे.

सिडको येत्या पाच वर्षात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. त्यातल्या 86 हजार 700 घरांची सोडत ऑगस्टमध्ये काढण्यात येणार आहे. या सोडतीचं नियोजन पूर्ण झालंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिडको आर्थिक दृष्ट्या दुर्बल तसेच अल्प उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध करून देत आहे.

युवकाच्या शरीरातून गर्भाशय आणि योनी काढली बाहेर, मुंबईत समोर आली दुर्मिळ घटना

त्यामुळे नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध होणार असून सर्वसामान्यांचे घरांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. या घरांमुळे नवी मुंबई मधील बिल्डर लॉबीलाही मोठा फायदा होणार आहे. सिडकोच्या वेबसाईटवर याचा फॉर्म उपलब्ध होणार असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.

मागच्या 47 वर्षात सिडकोने केवळ 30 हजार घरे बांधली होती. मात्र लोकसभा निवडणुकीआधी नवी मुंबईत सिडको 90 हजार घरे बांधणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. या महागृहनिर्मितीची सोडत ऑगस्ट मध्ये काढण्यात येणार आहे. यात 53 हजार घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर 38 हजार घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणार आहेत. यातील 35 टक्के घरे ही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत राखीव असणार आहेत. सध्या 86 हजार 700 घरांची सोडत काढण्यात येणार असून इतर घरांची सोडत लवकरच होणार असल्याचंही सांगण्यात आलंय.

Loading...

Underwater शूटनंतर प्रेग्नंट समीराने 9 व्या महिन्यात शेअर केला No makeup

घरांच्या सोडतीमध्ये सर्व प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असल्याने लोकांनी एजंट्च्या अमिषांना बळीपडू नये असं आवाहन करण्यात आलंय. घर मिळवून देतो असं सांगत अनेकांना लुबाडण्यात आल्याच्या घटना या आधी घडल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2019 04:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...