सिडकोची घरं असणाऱ्यांसाठी खूशखबर, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय

सिडकोची घरं असणाऱ्यांसाठी खूशखबर, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय

सिडकोतील लीज होल्ह प्रॉपर्टी आता फ्री होल्डमध्ये परावर्तीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी औरंदाबादेमध्ये जाहीर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर : सिडकोची घरं असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कारण राज्यातल्या सिडकोच्या जागेतील घरांना आता मालकी मिळणार आहे. सिडकोतील लीज होल्ह प्रॉपर्टी आता फ्री होल्डमध्ये परावर्तीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी औरंदाबादेमध्ये जाहीर केला आहे.

सिडकोवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा निर्णय आहे. सिडकोतील लीज होल्ड प्रॉपर्टी आता फ्री होल्डमध्ये परावर्तित होणार आहे. त्यामुळे आता राज्यातील सिडकोच्या जागेतील घरांना मालकी हक्क मिळणार आहे.

सिडकोने काही जागा लोकांना लीजवर दिल्या होत्या. त्यामुळे सरकारची ती प्रॉपर्टी रहिवाश्यांना विकता येत नव्हती, त्यावर त्यांचा मालकी हक्क नव्हता. त्यामुळे लोकांची मोठी कोंडी होत होती. पण सरकारच्या या निर्णयामुळे आता या जागेचा मालकी हक्क मिळणार आहे. त्यामुळे आता नागरिक प्रॉपर्टी विकू देखील शकतात.

दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी नवी मुंबईमध्ये सिडकोच्या घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली. नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या भागात सिडकोने घरे उभारलेली आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १८ लाखाचे घर तर अल्प उत्पन्न गटासाठी २६ लाखचं घर अशा स्वरुपाची ही लॉटरी होती.

VIDEO : 10 वर्षात 11 गुन्ह्यांचा शोध लावणाऱ्या श्वान राणीचा जिगरबाज प्रवास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2018 03:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading