चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर पादचारी पुलाचा भाग कोसळला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2017 10:07 PM IST

चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर पादचारी पुलाचा भाग कोसळला

मुंबई, 14 आॅक्टोबर : एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर पुलांच्या रुंदीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. ही घटना ताजी असतानाच चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर पादचारी पुलाचा जिन्यावरील मधला भाग कोसळला. या दुर्घटनेत एका नागरिकाला किरकोळ दुखापत झालीये.

चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर पूर्वेकडील ठाकूरद्वारकडे जाणारा पादचारी पूलाचा जीन्यावरील मधला भाग कोसळला.  स्टेशन बाहेरील हा पूल धोकादायक अवस्थेत आहे. या संदर्भात स्थानिक शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांसह याआधी अनेक वेळा रेल्वे आणि महापालिका प्रशासनाला याआधी कल्पना दिली. आणि पुलाच्या दुरूस्तीची मागणीही केली होती.

आजच सकाळी महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांना पुलावर बोलवून खासदार अरविंद सावंत यांनी पाहणी केली होती. आणि तात्काळ पूलाच्या दुरूस्तीचं काम करण्यास अधिकाऱ्यांना सांगितलं. त्याच पुलाचा काही भाग आज रात्री ८:३० च्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत मोठी हानी झाली नसली तरी रेल्वे पादचारी पुलांची धोकादायक परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर बनत चाललीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2017 09:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...