VIRAL VIDEO : चर्चचे फादर जेव्हा गरब्याच्या तालावर बेफाम नाचतात..

VIRAL VIDEO : चर्चचे फादर जेव्हा गरब्याच्या तालावर बेफाम नाचतात..

मुंबईतल्या एका दांडियाचा हा व्हिडिओ क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला. एक ख्रिश्चन पाद्री एखाद्या प्रोफेशनल डान्सरसारखे गाण्याच्या तालावर थिरकताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. हा गरबा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

  • Share this:

मुंबई, १८ ऑक्टोबर : मुंबईतल्या एका दांडियाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूम करतोय. माटुंग्याच्या डॉन बॉस्को चर्चच्या मैदानावर एका दांडियाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्या वेळचा हा व्हिडिओ. दांडिया आणि गरबाचं तालबद्ध संगीत सुरू झालं आणि या चर्चचे फादर क्रिस्पिनो डिसूझा या यांनीसुद्धा त्या ठेक्यावर ताल धरला.

थोड्याच वेळात हे फादर प्रत्यक्ष गरब्यात उतरले आणि असे मनसोक्त नाचले. चर्चे पाद्री त्यांच्या नेहमीच्या गणवेशातच दांडियात नाचायला लागल्यावर अनेकजण आश्चर्यचकित झाले. सुरेश शेट्टी नामक व्यक्तीनं याचा शूटिंग करून हा व्हिडिओ व्टिवटरवर शेअर केला आणि तो अल्पावधीत व्हायरल झाला.

हे फादर गरबा किंवा दांडियाच्या पारंपरिक ठेक्यावर नाचत नसले तरीही त्यांचं नृत्यकौशल्य पाहता ते कुठल्याही नृत्य कलाकारापेक्षा कमी वाटत नाही.

Loading...

ख्रिश्चन पाद्रींचा हा गरबा डान्स सोशल मीडियावर शेअर झाल्यावर अनेकांनी याचं कौतुक केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2018 04:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...