चुनाभट्टी गॅंगरेपप्रकरणी SIT नेमणार, पीडितेच्या भावाला पोलिस संरक्षण

चुनाभट्टी गॅंगरेपप्रकरणी SIT नेमणार, पीडितेच्या भावाला पोलिस संरक्षण

मुंबईच्या पोलिस निरीक्षक श्रीमती शिर्के यांनी भावाला नीट वागणूक दिली नसल्याचा आरोप लक्षात घेऊन त्यांची चौकशी करावी आणि त्याआधारे योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

  • Share this:

मुंबई, 1 सप्टेंबर: जालना जिल्ह्यातील तरुणीवर मुंबईतील चुनाभट्टी पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये घडलेल्या सामूहिक अत्याचारानंतर झालेल्या मृत्यूघटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने यापूर्वीच स्वाधिकारे दखल घेतली आहे. तशी मुंबई पोलिसांना 29 ऑगस्टला नोटीसही बजावण्यात आली आहे.

या घटनेसंदर्भात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडित तरुणीचा भाऊ, इतर नातेवाईक व सहकारी यांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले आणि न्याय मिळवून देण्याचा दिलासा दिला. यावेळी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे, अतिरिक्त पोलिस आयुक्त लख्मी गौतम, पोलिस उपायुक्त शशी मीना उपस्थित होते.

पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी लक्षात घेऊन आणि पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून या घटनेचा तपास 'सीबी-सीआयडी'कडे त्वरीत सोपविण्यात येईल, असे विजया रहाटकर यांनी यावेळी सांगितले. 'सीबी-सीआयडी'कडून त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात जाईल. पीडितेच्या भावाला पोलिस संरक्षण दिले जाईल.

या घटनेचा प्रारंभिक तपास करताना मुंबईच्या पोलिस निरीक्षक श्रीमती शिर्के यांनी भावाला नीट वागणूक दिली नसल्याचा आरोप लक्षात घेऊन त्यांची चौकशी करावी आणि त्याआधारे योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात तज्ज्ञ, निष्णात डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन (पोस्ट मार्टेम) करावे. हे शवविच्छेदन करताना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा काटेकोर अवलंब करावा. या शवविच्छेदनाला भाऊ आणि त्यांच्या पालकांनी संमती दिलेली आहे. औरंगाबादमधील घाटी रूग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेच्या कुटुंबीयांना नीट वागणूक दिली नाही, हा आरोप लक्षात घेऊन संबंधित डॉक्टरांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. या घटनेमध्ये 'मनोधैर्य' योजनेतंर्गंत पीडितेच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य त्वरीत दिले जावे. त्यासाठी सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या निर्देश संबंधितांना दिले आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, 1993 अंतर्गंत कलम 10(1)(क) (एक) व (दोन) आणि कलम 10(2) अन्वये आयोगाने ही कार्यवाही केली आहे.

VIDEO :...जर सेनासोबत नसेल तर भाजपला इतक्या जागा, आठवलेंचं भाकीत

First published: September 1, 2019, 9:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading