मुंबईत मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत तरुणीचा नाहक बळी, संतप्त नातेवाईकांचं आंदोलन

मुंबईत मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत तरुणीचा नाहक बळी, संतप्त नातेवाईकांचं आंदोलन

गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने चालकाने रस्त्यातून चालणाऱ्या तीन तरुणींच्या अंगावरगाडी घातली. त्यापैकी एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

  • Share this:

मुंबई, 07 डिसेंबर : मुंबईच्या चुनाभट्टीत कारच्या धडकेत एका  तरुणीला आपला जीव गमावावा लागला आहे. काल रात्री सव्वानऊ वाजता एका भरधाव चार चाकीने वीस वर्षीय अर्चना पार्टी या तरुणीला उडवलं. चार चाकीमधले चारही तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने चालकाने रस्त्यातून चालणाऱ्या तीन तरुणींच्या अंगावर गाडी घातली. त्यापैकी एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर चालकाने गाडी सोडून पळ काढला. मात्र, स्थानिकांनी इतर दोघांना पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिलं. यानंतर मृत्युमुखी पडलेल्या तरुणीच्या संतप्त नातेवाईकांनी चुनाभट्टी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन सुरू केलं. काहीही चूक नसताना एका 20 वर्षांच्याया तरुणीला आपला जीव गमवावा लागला.

इतर बातम्या - रिक्षा चालकाने केला चिमुकलीवर बलात्कार, रक्ताने माखलेल्या पीडितेवर उपचार सुरू

जोपर्यंत सर्व  आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मुलीचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी घेतलेला आहे. दरम्यान, पोलीस या संपूर्ण प्रकाराचा अधिक तपास करत आहेत.

इतर बातम्या - धक्कादायक! 3 वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाने केला बलात्कार, आरोपी ताब्यात

Published by: Renuka Dhaybar
First published: December 7, 2019, 12:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading