मुंबई, 30 जानेवारी : भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत तुलना केल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. पण, 'मी कोणाचीच तुलना नाही केली. त्यांची जागा कुणीच घेवू शकत नाही' अशी सारवासारव वाघ यांनी केली.
'आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्योतिबांचा शोध आहे,’ असं विधान चित्रा वाघ यांनी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावर अखेर वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.
(हिंदुत्व ‘खतऱ्या’त येत असेल तर...,शिवसेनेची भाजपवर जळजळीत टीका)
'जे माझ्यावर टीका करत आहे. त्यांच्या पक्षात असताना मी अनेकदा हे वाक्य बोलले आहे. तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही. जे जेंटर इक्वालिटीवर बोलतात तेच आज आरोप करत आहेत. मी कोणाचीच तुलना नाही केली. त्यांची जागा कुणीच घेवू शकत नाही. पण ज्यांची समजून घेण्याची कुवत नाही आहे. त्यांना कृतीत काहीच चांगले दिसले नाही, असं म्हणत वाघ यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली.
(आदित्य ठाकरेंच्या वरळी शिंदे गटाचा 'सर्जिकल स्ट्राईक', पहिला नगरसेवक लागला गळाला)
'पुण्यात जिथे महिला स्वातंत्र्याची सुरूवात झाली तिथे हे घडत होते. मी काल माझ्या भावना सांगता येणार नाही अशा आहेत. काल दादा फक्त बोलले नाही तर त्यांनी कृतीत आणले. कोणीच तुलना करू शकत नाही, असा खुलासा वाघ यांनी केला.
'मला आश्चर्य वाटतंय आहे की, कोणतेही वाक्य पूर्ण न ऐकता त्यावरून वादंग निर्माण केला जात आहे. काल हळदी कूंकूचा कार्यक्रम होता. पण माझे स्वागत करताना मला पुरुषांनी औक्षण केले. काल पाच पुरूषांनी माझे औक्षण केले दादा म्हणाले की, तुम्ही भगिणी नेहमी आमचे यश चिंतन करता आता पुरूषांनी पण हे भगिणींसाठी केले पाहिजे, असं वाघ म्हणाल्या.
भीम आर्मीने दिली तोंडावर शाई फेकण्याची धमकी
दरम्यान, चित्रा वाघ तूमचं डोकं फिरलंय का? चंद्रकांत पाटलांना महात्मा ज्योतिबा फुलेंची उपमा देवून तुम्ही महात्मा फुलेंचा अवमान केला आहे . महाराष्ट्राचा,देशाचा अवमान केला आहे, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, तुमच्या वक्तव्याचा जाहीर तीव्र निषेध आहे. भीम आर्मी च्या महिला ब्रिगेड तुमचा शाईने सत्काराचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये लवकरच करतील, असा इशाराच भीमा आर्मीचे अशोक कांबळे यांनी दिला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
“काही मिनिटांपूर्वी दादा खूप छान बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणते की पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे. मी नेहमीच म्हणते की आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत. मात्र, चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र जारी आहे. असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा सुभेच्छा देते,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.