• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Chipi Airport inauguration: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंची खुर्ची बाजूबाजूला, एकमेकांशी संवाद साधणार?

Chipi Airport inauguration: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंची खुर्ची बाजूबाजूला, एकमेकांशी संवाद साधणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंची खुर्ची बाजूबाजूला, एकमेकांशी संवाद साधणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंची खुर्ची बाजूबाजूला, एकमेकांशी संवाद साधणार?

Chipi Airport inauguration: चिपी विमानतळाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा उपस्थित असणार आहेत.

  • Share this:
मुंबई, 9 ऑक्टोबर : कोकण रेल्वे नंतर कोकणच्या विकासात महत्वाची भूमीका ठरणारा चीपी विमानतळाचे (Chipi Airport) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. सिंधुदूर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या पर्यटन विकासात गेमचेंजर तसेच गोवा विमानतळाला पर्याय म्हणूनही सध्या चीपी विमानतळाकडे पाहीलं जातंय. दुपारी 1 वाजता या विमानतळाचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) हे देखिल उपस्थित राहणार आहेत. इतकेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची खुर्ची एकमेकांच्या आजुबाजुला असणार आहे. दोन्ही नेते एकमेकांसोबत संवाद साधणार का? हे पहावं लागेल. त्यामुळे राजकीय वर्तुळात या उद्धघाटन सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. चीपी विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचं दुपारी 12 वाजता आगमन होणार आहे. त्यावेळी मोठा जल्लोष देखील होणार आहे. दरम्यान चीपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात राजकिय मानपमान तसेच श्रेयवादाची रस्सीखेच देखील पहायला मिळणार याची चुणूक गेले आठवढाभर कोकणात सुरू असलेल्या पोस्टर वाँरवरून दिसून येतंय. कोकणात हप्तेबाजी सुरू, हप्ते घेणाऱ्यांच्या नावाचा भांडाफोड करणार : नारायण राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला शुक्रवारी एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, चिपी विमानतळावरुन पहिलं विमान जेव्हा उड्डाण करेल तेव्हा मला वेगळाच आनंद होईल. माझ्या आयुष्यातील स्वप्न होतं की या सिंधुदुर्गातून विमानाने टेक ऑफ घ्यावा ते पूर्ण होत आहे. सिंधुदुर्गातील लोक साक्षीदार आहेत. यांनी काय केलं? आम्हीच सर्व केलं. परवानगी सुद्धा मी आणली. यांना कोण विचरतंय दिल्लीत? कायद्याने कामे करावी लागतात. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा, लोकप्रतिनिधींचा सिंधुदुर्गातील कंत्राटदारांना फार त्रास आहे. चौपदरीकरणाचं काम सुरू झालं तेव्हाही गाडी घेतल्याशिवाय काम करू दिलं नाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी. चिपी विमानतळ उद्घाटनावरून भाजपची पोस्टरबाजी कोकणात पुन्हा एकदा चिपी विमातळाच्या निमित्ताने राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष उभा राहत असल्याचं चित्र आहे. भाजप नेत्यांच्या पोस्टरबाजीनं याला सुरुवात झाली आहे. चिपी विमानतळाचं उद्घाटनपूर्वीच श्रेयवादानं जोर धरला आहे. भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी जोरदार होर्डिंगबाजी करत चिपी विमानतळ हे नारायण राणेंच्या प्रत्यत्नातूनच साकार होत असल्याचा टोला शिवसेनेला लगावला आहे. चिपी विमानतळाचं श्रेय शिवसेना घेण्याचा प्रयत्न करत असेल, तरी प्रत्यक्षात राणेंनी केलेले प्रयत्न आणि त्याला आलेली फळं हे वास्तव कोकणातील जनतेला चांगलंच ठाऊक असल्याचा दावा भाजपनं केला आहे. चिपी विमानतळाचा आज श्रीगणेशा! शक्तीप्रदर्शन केवळ राणेच करू शकतात कोकणात शक्तीप्रदर्शन केवळ राणेच करू शकतात, इतर कुणाचाही तो घास नाही, असं म्हणत भाजपनं शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. वाघाच्या गुहेत येऊन कुणीही शक्तीप्रदर्शन करू नये, असं सांगत त्यांनी कोकणात नारायण राणेंची कुणाशीही तुलना होऊ शकत नसल्याचं विशाल परब यांनी म्हटलं आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा भाजपनं शिवसेनेला छेडण्याचा प्रयत्न केला आहे. चीपी विमानतळाचे वेळापत्रक मुंबई ते सिधुदूर्ग आणि सिधुदूर्ग ते मुंबई असा हवाई प्रवास 9 ऑक्टोबरपासून सुरू होतोय. त्यासाठी दररोज होणार्या नव्या चीपी विमानतळावर विमानांचे उड्डाण वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. 1) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भूजहून येणारे '9आय661' क्रमांकचे विमान मुंबईहून सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सिंधुदुर्गसाठी टेक ऑफ घेईल. हे विमान विमानतळावर दुपारी 1 वाजता पोहोचेल. 2) विमानाचा '9आय661' सिंधुदुर्गातून परतीचा प्रवास दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी सुरू होईल. हे विमान मुंबईत 2 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल. 3) सिंधुदुर्गातून शहरात जाण्यासाठी 'अलायन्स एअर' चे 70 आसनी एटीआर 72-600 विमान तैनात राहणार आहे. 4) उद्घाटनाच्या दिवशी मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासाचे भाडे 2,520 आहे तर सिंधुदुर्ग मुंबई प्रवासासाठी 2,621 रुपये असेल.
Published by:Sunil Desale
First published: