• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • कोरोना व्हायरसचा धोका, मुंबईतल्या संशयित रुग्णांची संख्या 3वर

कोरोना व्हायरसचा धोका, मुंबईतल्या संशयित रुग्णांची संख्या 3वर

सगळे रुग्ण हे चीन आणि हाँगकाँगहून परतले होते. त्यांना ताप, सर्दी, खोकला झाल्यामुळे त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आलंय.

  • Share this:
ठाणे 24 जानेवारी : सध्या चीन मध्ये थैमान घातलेलं कोरोना वायरस मुंबईच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. मुंबईत गुरुवारी 2 आणि शुक्रवारी एक अशा तीन संशयित रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. यातील गुरुवारी दाखल करण्यात आलेले रुग्ण हे वसई नालासोपारा या भागातले आहेत. तर शुक्रवारी दाखल करण्यात आलेला रूग्ण हा  ठाणे जिल्ह्यातला आहे. यापैकी पहिले दोन रुग्ण हे चीन ला तर तिसरा रुग्ण हाँगकाँग ला जाऊन आलाय. तिथून परतल्यानंतर या तिघांनाही ताप खोकला अंगदुखी अशी लक्षणं दिसू लागली. त्यामुळे या तिघांनाही सध्या संशयित रुग्ण संबोधले जातंय. या तिघांनाही कस्तुरबा गांधी रुग्णालयातील विशेष कक्षामध्ये ठेवण्यात आले असून चार चार कक्षांचे 4 वार्ड तयार करण्यात आले आहे. या चार कक्षांसाठी पुरेसे डॉक्टर असून सध्या या रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल व्हायरॉलॉजी सेंटर इथे पाठवण्यात आले आहेत. दोन रूग्णांच्या रक्त तपासणी चा रिपोर्ट शनिवारी येणार आहे. त्यानंतर महापालिकेला या रुग्णांना करोना व्हायरसची लागण झाली आहे का हे कळेल तोवर हे रुग्ण संशयित रुग्णच आहेत. VIDEO स्मृती इराणींसमोरच PM मोदी म्हणाले, 'सास भी कभी...' महापालिकेच्या वतीने मुंबईकरांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही असे सांगितले आहे तरीही ताप खोकला येत असल्यास आणि तो औषधांनी बरा होत नसल्यास कस्तुरबा गांधी रुग्णालयात येऊन तपासणी करून घ्यावी असे सांगण्यात आले आहे.

पंकजा मुंडे यांची नाराजी दूर? भाजपने घेतला 'हा' निर्णय

महापालिका या रोगाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं मुंबई महापालिकेचे म्हणणं आहे तरीही नागरिकांनी स्वतः ही लक्षणे आढळल्यास काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. सोबतच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुद्धा महापालिका आणि विमानतळातील डॉक्टर चीन आणि हाँगकाँगमधून येणार्‍या लोकांची  तपासणी करत आहेत. जेणेकरून वायरस  पसरू नये. मुख्य म्हणजे हे तीनही रुग्ण ठाणे जिल्ह्यातील असून मुंबई शहर किंवा उपनगर परिसरात अजून एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही.
Published by:Ajay Kautikwar
First published: