News18 Lokmat

डोंबिवलीमध्ये बच्चेकंपनीचा 'आपला कट्टा', सुरू केलं वाचनालय

या उपक्रमासाठी प्रत्यकाने स्वतः कडील तसंच आपल्या विभागातील घरोघरी जाऊन पुस्तके गोळा केली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 4, 2017 08:46 PM IST

डोंबिवलीमध्ये बच्चेकंपनीचा 'आपला कट्टा', सुरू केलं वाचनालय

प्रदीप भणगे, डोंबिवली

04 मे : डोंबिवली - पूर्वेतील श्रीखंडेवाडीतील 27 शालेय विद्यार्थ्यांनी सुट्टीत एकत्र येऊन 'आपला कट्टा' हे छोटे वाचनालय सुरू केले आहे. या उपक्रमासाठी प्रत्यकाने स्वतः कडील तसंच आपल्या विभागातील घरोघरी जाऊन पुस्तके गोळा केली आहे.

विशेष म्हणजे आर्थिक मदत न घेता हे छोटे वाचनालय सुरू केले आहे. या वाचनालयाचा उपयोग ज्येष्ठ नागरिक सुद्धा करत आहेत. या वाचनालयाचे कामकाज सकाळ आणि सायंकाळ अशा 2 सत्रात चालते. पुस्तके घरी वाचायला नेल्यानंतर ती पुन्हा आणून द्यावी लागतात. त्याची नोंद सुद्धा केली जाते. विशेष म्हणजे ह्या वाचनालयाचा सर्व कारभार बच्चे कंपनी पाहतात. त्याचबरोबर पुस्तकात काय वाचले, पुस्तकातील सारांश, गोषवारा , आवडलेली घटना आणि एखादी कथा सांगण्याचा नियम त्यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2017 08:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...