बापरे! डोंबिवलीत हे काय घडलं? पोलिसांच्या नाकावर टिच्चून झाला बालविवाह

बापरे! डोंबिवलीत हे काय घडलं? पोलिसांच्या नाकावर टिच्चून झाला बालविवाह

सांगर्ली भागातील सोसायटीमधील अतिशय गुप्तपणे एका घरात हा विवाह पार पडला. पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे.

  • Share this:

डोंबिवली 3 जुलै: सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय संपन्न असलेल्या डोंबिवलीत (Dombivali) बालविवाह (Child Marriage) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 जून रोजी दुपारी 15 वर्षांची  अल्पवयीन मुलगी व 26 वर्षांचा तरुण यांचा विवाह गुपचूप संपन्न झाला. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सजगतेमुळे नवरदेव तसेच दोघांच्या 6 नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे. सांगर्ली भागातील सोसायटीमधील अतिशय गुप्तपणे एका घरात पार पडलेल्या बाल विवाहातील अल्पवयीन मुलीचे वय फक्त 15 वर्ष, 3 महिने, 11 दिवस आहे. तर नवरदेव 26 वर्षांचा आहे असे मानपाडा पोलिस एपीआय आंधळे  यांनी सांगितले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विरोधी संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह ऍड रंजना गवांदे (संगमनेर) यांना आलेल्या निनावी फोनद्वारे मिळालेल्या माहीतीनुसार अंनिस कायदा व्यवस्थापन विभागाच्या राज्य सहकार्यवाह ऍड. तृप्ती पाटील (डोंबिवली) यांना 30 जून रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान फोन झाला.

त्यांनी डोंबिवलीच्या मानपाडा भागातील एका सोसायटीच्या घरात बालविवाह होणार असल्याबद्दल तक्रारीची माहिती सांगितली. मुलगी ही अल्पवयीन असुन अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे असे समजले. ऍड. तृप्ती पाटील यांनी ताबडतोब मानपाडा पोलीस ठाण्यास कळवले आणि त्यांनी लगेचच बीट मार्शल आपल्या हद्दीत शहानिशा करण्यास पाठवले.

मंदिरात जाण्यासाठी हवा होता पास, मोदी म्हणाले..आणि काम झालंच

परंतु तरीही काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे स्वत: ऍड. तृप्ती पाटील, अंनिसचे ठाणे जिल्हाप्रमुख प्रा. प्रवीण देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शोध घेतला असता अपेक्षित असलेले ठिकाण सापडले.

हा बालविवाह बुधवारी दुपारी संपन्न झाला असे मानपाडा पोलिस एपीआय आंधळे  यांनी सांगितले. कार्यकर्त्यांकडे संपूर्ण पत्ता व इतर माहिती नसल्यामुळे हा बालविवाह होताना तो थांबवू शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे वेळ खूप कमी होता.

डायलेसिस करताना रुग्णाचा मृत्यू, डॉक्टर घरीबसून VCवर देत होता कंपाउडरला सूचना

परंतु त्या दरम्यान पोलिसांना सोबत घेऊन बालविवाह पार पाडण्यासाठी जबाबदार असलेल्यांना पकडण्यात यश मिळाले. त्यानंतर सर्वांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी ऍड. तृप्ती पाटील यांच्या जबानीवरून नवरदेव, नवरी आणि नवरदेवाकडील नातेवाईकांवर बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: July 3, 2020, 10:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading